शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

कामात हलगर्जी केल्यास फौजदारी कारवाई करणार - जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 20:51 IST

Corona News In Sangli : तहसिलदार कार्यालय शिराळा येथे आयोजित करण्यात आलेल्या सद्यस्थितील कोरोना कामकाज आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी बोलत होते.

ठळक मुद्देज्या गावांमध्ये कोविड रुग्णांची संख्या जास्त आहे. त्या गावांमध्ये संस्थात्मक अलगीकरणावर भर देण्यात यावा. संबधित गावातील ग्राम दक्षता समित्यांनी सक्षमपणे काम करुन जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असेही डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.  

सांगली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची दाहकता जास्त असून तिची व्यापकताही मोठी आहे. त्यामुळे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी महसूल व संबधित विभागाच्या यंत्रणांशी समन्वय ठेवून काम करावे. समन्वयामध्ये अभाव झाल्यास यंत्रणांचे काम बिघडु शकते. कोविडच्या काळात जनतेमधून तक्रारी येणार नाहीत याची काटेकोरपणे दक्षता घेणे आवश्यक आहे. कोविड कालावधीत कामामध्ये हालगर्जीपणा केल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिला आहे. (Criminal action will be taken for negligence in work - Collector)

तहसिलदार कार्यालय शिराळा येथे आयोजित करण्यात आलेल्या सद्यस्थितील कोरोना कामकाज आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय साळुंखे, प्रांताधिकारी ओमकार देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, तहसिलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पाटील तसेच वैद्यकीय अधिक्षक, डॉक्टर,पोलीस अधिकारी उपस्थितीत होते. 

राज्य शासनाच्या आदेशानुसार कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांना संस्थात्मक विलगीकरण करण्याबाबत नियोजन करण्यात यावे. यामध्ये सरसकट विलगीकरण न करता ज्या रुग्णांच्या घरी स्वतंत्र राहण्यासाठी व्यवस्था नाही, तसेच जे पॉझिटिव्ह आलेले रुग्ण् शासकीय नियमांचे पालन न करता बाहेर फिरत असतील अशांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवावे. तसेच जे रुग्ण् आपल्या कुंटुबाला संसर्ग होऊ नये अथवा आपल्यामुळे कोरोना पसरु नये यासाठी स्वत:हून संस्थात्मक विलगीकरण कक्षात जाण्यास तयार असतील त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात यावे, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.

याचबरोबर, संस्थात्मक विलगीकरणाच्या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या सोईसुविधांची वारंवार तपासणी करण्यात यावी. ज्या सुविधा उपलब्ध नसतील त्या तातडीने उपलब्ध करुन द्याव्यात. सद्यस्थितीत शिराळ्यात सहा ठिकाणी संस्थात्मक विलगीकरण सुरु असुन त्या ठिकाणी रुग्णांची संख्या संस्थेच्या मर्यादे नूसार ठेवण्यात यावी. तसेच ज्या गावांमध्ये कोविड रुग्णांची संख्या जास्त आहे. त्या गावांमध्ये संस्थात्मक अलगीकरणावर भर देण्यात यावा. संबधित गावातील ग्राम दक्षता समित्यांनी सक्षमपणे काम करुन जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असेही डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.  

जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन कॉन्संट्रेटर बँक हा उपक्रम राबविण्यात येत असून या ऑक्सिजन कॉन्संट्रेटर बँकचा प्रभावी वापर शिराळा तालुक्यात करण्यात यावा, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, आरोग्य यंत्रणा व महसूल यंत्रणेने बेड मॉनिटरिंग सिस्टीम अपडेट ठेवावी. हायरिस्क रुग्णांबाबत जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधुन सदर रुग्ण सांगली अथवा मिरज या ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे. बेडसाठी रुग्णांची हेळासांड होऊ नये यासाठी बेडची माहिती हॉस्पिटलच्याबाहेर दर्शनी भागात लावण्यात आलेली आहे ती अपडेट ठेवण्यात यावी. शिराळा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी औषधे, आवश्यक वैद्यकीय साहित्य तसेच आवश्यक असणारा निधीची विहित वेळेत मागणी जिल्हा प्रशासनाला सादर करावी. 

प्रत्येक महिन्याला या संबधिचा स्थानिकस्तरावर आढावा घेऊन आवश्यकते नूसार व प्रसंगानारुप स्थानिक पातळीवरही खरेदी प्रक्रिया राबवावी. लसीचा पुरवठा ज्या ज्या प्रमाणात होईल त्यानुसार वरिष्ठ पातळीवरील आदेश मिळतील त्यानुसार लसीकरणाचे कामकाज व्हावे, लसीकरणाच्या ठिकाणी गर्दी होऊ नये या बाबतचे नियोजन करण्यात यावे, त्याचबरोबर स्तनदा माता, गरोदर माता यांनाही लसीकरण करण्यात येणार असल्याने त्यांची माहिती संकलित करण्यात यावी. तसेच शासनाच्या निर्देशानुसार त्यांचेही लसीकरणाबाबतचे नियोजन करण्यात यावे. 18 ते 44 वयोगटातील लसीकरण मोठ्याप्रमणात असल्याने याबाबतची नोंदणी प्रक्रियानुसारच लसीकरण करण्यात यावी. तसेच आरोग्य व संबधित विभागातील अधिकारी, डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी रहावे असे आदेश डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. 

जिल्हाधिकाऱ्यांची शिराळा येथील उपजिल्हारुग्णालयाला भेट जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालय येथील कोविड हॉस्पिटला भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली. ज्या विभागांमध्ये कमतरता जाणवल्या त्या तातडीने पुर्ण कराव्यात असे आदेश देऊन रुग्णालयात ॲडमिट असलेल्या पेशंटच्या नातेवाईकांना दिवसातून दोन वेळा रुग्णांवर केलेल्या उपचारांची माहिती देण्यात यावी, असे सांगून हॉस्पिटलच्या दर्शनीभागात माहिती देण्यासाठी स्वतंत्र कक्ष कार्यन्वीत करण्यात यावा. तसेच ऑक्सिजन प्लँटच्या सुरक्षतेची संपुर्ण खबरदारी घेण्यात यावी. टँकमध्ये शिल्लक असलेल्या ऑक्सिजनची वेळोवेळी नोंदी घेऊन शिल्लक साठ्याची माहिती अद्यावत ठेवण्यात यावी. ऑक्सिजन प्लँटच्या ठिकाणी प्रशिक्षीत कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिली.  

टॅग्स :SangliसांगलीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस