काशीलिंगवाडीत किराणा दुकानदारावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:21 IST2021-05-03T04:21:56+5:302021-05-03T04:21:56+5:30

संख : काशीलिंगवाडी (ता. जत) येथील किराणा दुकानदार राजू आनंदा घेरडे याने शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून दुकान सुरू ठेवले ...

Crime against grocery shopkeeper in Kashilingwadi | काशीलिंगवाडीत किराणा दुकानदारावर गुन्हा

काशीलिंगवाडीत किराणा दुकानदारावर गुन्हा

संख : काशीलिंगवाडी (ता. जत) येथील किराणा दुकानदार राजू आनंदा घेरडे याने शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून दुकान सुरू ठेवले होते. लोकांची गर्दी करून सोशल डिन्सिंग न पाळता किराणा साहित्याची विक्री करीत होता. यामुळे त्याच्यावर जत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

शासनाने कोरोनाच्या पाश्वर्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत; परंतु जत पोलीस १ मे रोजी पेट्रोलिंग करताना काशीलिंगवाडी येथील राजू आनंदा घेरडे हा आपले विठाई किराणा स्टोअर्स उघडे ठेवून लोकांची गर्दी करून किराणा साहित्याची विक्री करत असल्याचे आढळून आले.

यामुळे शासन आदेशाचे उल्लंघन केल्याचा त्यावर गुन्हा नोंद झाला आहे.

Web Title: Crime against grocery shopkeeper in Kashilingwadi