क्रिकेट प्रशिक्षक राजू निपाणीकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:29 AM2021-09-27T04:29:20+5:302021-09-27T04:29:20+5:30

सांगली : येथील क्रिकेट प्रशिक्षक हरीष ऊर्फ राजू श्यामराव निपाणीकर (वय ५०, रा. शामरावनगर) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्यावर ...

Cricket coach Raju Nipanikar passes away | क्रिकेट प्रशिक्षक राजू निपाणीकर यांचे निधन

क्रिकेट प्रशिक्षक राजू निपाणीकर यांचे निधन

Next

सांगली : येथील क्रिकेट प्रशिक्षक हरीष ऊर्फ राजू श्यामराव निपाणीकर (वय ५०, रा. शामरावनगर) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्यावर येथील वसंतदादा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते.

अनेक दिवसांपासून ते प्रकृतीशी लढत राहिले. येथील क्रिकेटविश्वात त्यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाने वेगळी छाप सोडली. राजू निपाणीकर यांनी येथील छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर महिला व पुरुष क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देण्याचे काम केले. जवळपास एक तप ते या कार्यात होते. प्रत्येक खेळाडूशी जिव्हाळ्याचे, मैत्रीचे नाते त्यांनी जपले. गुणवत्तेचा शोध घेऊन त्या खेळाडूला योग्य संधी देण्यासाठी ते नेहमी झटत होते. क्रिकेट स्पर्धांच्या संयोजनातही ते नेहमी अग्रेसर राहिले. जिल्हा क्रिकेट संघटनेसोबत त्यांनी काम केले. ज्येष्ठ क्रिकेट मार्गदर्शक विष्णू शिंदे यांच्या खांद्याला खांदा लावून प्रशिक्षण दिले. उत्तम संयोजक म्हणून त्यांची ओळख

होती.

Web Title: Cricket coach Raju Nipanikar passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app