शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

'शक्तिपीठ'साठी पोलिस बंदोबस्तात मोजणी, सांगलीतील शेटफळे येथे शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; जमिनीवर झोपून मोजणी पाडली बंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 16:51 IST

"आधी भरपाई, नंतर मोजणी"ची ठाम भूमिका

आटपाडी : शेटफळे (ता. आटपाडी) येथे शक्तीपीठ महामार्गासाठी आज शेटफळे येथे दुसऱ्यांदा मोजणीस सुरुवात झाली. मात्र, शेतकऱ्यांनी तगड्या पोलिस बंदोबस्तातही मोजणीला तीव्र विरोध केला. "शेतकरी एकजुटीचा विजय असो" अशा घोषणा देत मोठ्या संख्येने शेतकरी एकवटले अन् जमिनीवरच झोपले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महामार्गाचे नियोजन शेटफळे गावातून करण्यात आले आहे. सुमारे ४२९ शेतकऱ्यांच्या जमिनींचा या प्रकल्पात समावेश असून, ४० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित होणार आहे.महसूल विभागाने मोजणीसाठी केवळ एक ते दोन दिवस आधी, म्हणजे मंगळवारी, शेतकऱ्यांना नोटिसा पाठवल्या. याआधीही मोजणीसाठी आलेल्या पथकाला शेतकऱ्यांच्या विरोधाचा सामना करावा लागल्याने मोजणी रद्द करण्यात आली होती.शेतकऱ्यांची मुख्य मागणी आहे की, मोजणी करण्याआधी भरपाईचे निकष जाहीर करावेत. यासंदर्भात प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल यांनी दोन वेळा शेतकऱ्यांसोबत बैठकाही घेतल्या. मात्र, प्रशासनाने यावेळी कोणतीही भरपाई जाहीर न करता मोजणी सुरू केल्याने नाराजी वाढली आहे.आज बुधवारी मोजणीवेळी तहसीलदार सागर ढवळे आणि पोलीस निरीक्षक विनय बहिर हे घटनास्थळी उपस्थित होते. प्रशासनाकडून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तरीही शेतकऱ्यांनी शांततेत पण ठाम विरोध नोंदवत मोजणीला विरोध केला. प्रशासनाची पुढील भूमिका काय असेल आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांना दाद दिली जाईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोजणी सुरूच शेतकऱ्यांच्या विरोधात नंतरही प्रशासनाकडून सायंकाळी उशिरापर्यंत मोजणी सुरूच होती. प्रशासन मोजणीवर ठाम असून मोजणी सुरूच आहे.