शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

ऊस वाहतुकीचा खर्च वाढला, कारखान्यांकडून दर मात्र दोन वर्षांपूर्वीचेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 11:59 IST

दोन वर्षांपूर्वी डिझेलचा दर ६८ रुपये प्रतिलिटर होता. आता तो ९४ रुपयांपर्यंत गेला तरी कारखान्यांनी जुनेच वाहतूक दर कायम ठेवले आहेत.

संतोष भिसेसांगली : डिझेलसह विविध घटकांच्या दरवाढीने ऊस वाहतुकीचा खर्च ३० टक्क्यांनी वाढला आहे. साखर कारखान्यांनी मात्र दरवाढ दिलेली नाही. काही कारखान्यांनी दोन वर्षांपूर्वीचाच डिझेलचा दर गृहित धरुन करार केले आहेत.दोन वर्षांपूर्वी डिझेलचा दर ६८ रुपये प्रतिलिटर होता. आता तो ९४ रुपयांपर्यंत गेला तरी कारखान्यांनी जुनेच वाहतूक दर कायम ठेवले आहेत. जिल्ह्यातील कारखान्यांचे या हंगामातील ऊस वाहतुकीचे दर १०० किलोमीटरपर्यंत सरासरी ४०० ते ५२० रुपये प्रतिटन असे आहेत. चालकांचे पगार गतवर्षीपेक्षा दोन हजारांनी वाढून १४ ते १५ हजारांपर्यंत गेले. दिवसभरात एक खेप केल्यानंतर ट्रक मालकाच्या पदरात हजार-पंधराशे रुपये पडतात. हंगामात दुरुस्ती काम निघाले तर २५ ते ५० हजारांचा खड्डा पडतो. व्यवसाय आतबट्ट्याचा झाला असला, तरी दोन वर्षे गाडीला कामच नसल्याने यंदा नाईलाजास्तव वाहने कारखान्याला जुंपल्याचे वाहतूकदारांनी सांगितले.असा आहे हिशेब- वाहतुकीचे जाता-येता अंतर - ७० किलोमीटर- प्रतिटन सरासरी दर - ४५० रुपये- १५ टनांसाठी मिळालेले भाडे - ६७५० रुपये- डिझेल खर्च - ४००० रुपये- चालक पगार - ५०० रुपये- देखभाल-दुरुस्ती व घसारा - सरासरी १००० रुपये- ट्रक मालकासाठी शिल्लक - १२५० रुपये

अशी वाढली महागाई- डिझेल - ६८ रुपयांवरुन ९४ रुपये प्रतिलिटर- टायर - ३० हजारावरुन ३५ हजार रुपये- ऑईल - ३५० वरुन ५०० रुपये प्रतिलिटर- चालक पगार - १३ हजारावरुन १५ हजार रुपये- दुरुस्तीचा खर्च सरासरी २० ते ३० टक्के वाढला

हंगामात नऊ लाख मिळविले, पण...गेल्या वर्षी हंगामाच्या अखेरीस एका ट्रक मालकाचे नऊ लाखांचे बिल कारखान्याकडून येणे होते. त्याचे तितकेच पैसे तोडणी मुकादमाकडे अडकून पडले होते. पैसे घेऊनही त्याने टोळ्या पाठविल्या नव्हत्या. त्यामुळे कारखान्याकडून बिल मिळालेच नाही. शेवटी त्याने वर्षभर मुकादमाकडून ३०-४० हजाराप्रमाणे निम्मी रक्कम वसूल केली. अजूनही साडेचार लाख रुपये येणे आहेत.

कारखान्यांनी दोन वर्षांपूर्वी वाहतुकीचे दर ठरवून दिले होते, ते आजपावेतो वाढविलेले नाहीत. वाहतूकदारांचे ऐकण्याची त्यांची मानसिकता नाही. ऊसतोडणीचा दर साखर संघाकडून निश्चित केला जातो, पण वाहतूकदार संघटित नसल्याने त्यांची लूट होते.  - नागेश मोहिते, वाहतूकदार, मांजर्डे (ता. तासगाव)

वीस-तीस लाखांचा ट्रक घ्यायचा, आणि महिन्याकाठी २५ हजार रुपये मिळवायचे असा हा व्यवसाय आहे. ट्रकची दुरुस्ती निघाली तर ३०-४० हजारांचा खड्डा पडतो. उसाच्या हंगामात मिळालेले चार पैसे पदरात पडतील याची हमी नसते. डिझेल आणि सुट्या भागांच्या वाढत्या किमतींमुळे अनेक ट्रकमालक कर्जाच्या खाईत लोटले गेले आहेत.  - नामदेव सोनूर, वाहतूकदार, तासगाव

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखानेDieselडिझेल