घर बांधकामाचा खर्च दुपटीने वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:29 IST2021-04-28T04:29:22+5:302021-04-28T04:29:22+5:30
पशू योजनांबाबत जनजागृती करा सांगली : पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशू पालकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र बहुतांश पशू पालकांना ...

घर बांधकामाचा खर्च दुपटीने वाढला
पशू योजनांबाबत जनजागृती करा
सांगली : पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशू पालकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र बहुतांश पशू पालकांना या योजनांची माहिती नसल्याने ते या योजनांचा लाभ घेऊ शकत नाही. पशुसंवर्धन विभागाने या योजनांची व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. पशुपालन हा शेतीला चांगला जोडधंदा आहे. त्यामुळे या योजनांची जनजागृती करावी.
आटपाडी मार्गावरील बसफेऱ्या वाढवा
करगणी : आटपाडी तालुक्यातील अनेक नागरिक सांगली ते आटपाडी रुग्णालयाच्या निमित्ताने ये-जा करतात. त्यामुळे या मार्गावरून नेहमीच प्रवाशांची वर्दळ राहते. त्या तुलनेत बसफेऱ्या कमी आहेत. आता लॉकडाऊन खासगी वाहनेही नाहीत. परिणामी अत्यावशक सेवेतील प्रवाशांचे हाल होत आहे.
कुटुंब नियोजनाबाबत जनजागृतीची गरज
सांगली : लोकसंख्येला आळा घालण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती झाल्यानंतर कुटुंब नियोजन करण्याचे प्रमाण वाढले असले, तरी यामध्ये पुरुषांचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. कुटुंब नियोजनात महिला आघाडीवर आहेत. पुरुषांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे.
तंटे मिटविण्यात समित्या अपयशी
सांगली : जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये तंटामुक्त समित्या केवळ कागदोपत्री असल्याचे दिसून येते. गावात भांडण-तंटे वाढत आहेत. मात्र समित्या तंटे मिटविण्यात अपयशी ठरत आहेत. तंटामुक्त समित्यांनी वाद मिटविण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे.
रस्त्याशेजारी वाहने ठेवणाऱ्यांवर कारवाई करा
मिरज : शहरातील चारही मुख्य महामार्गांच्या बाजूला ट्रक व इतर वाहने उभी ठेवली जातात. अनेकांकडे जागा नसतानाही वाहने खरेदी केली आहेत. रात्रंदिवस रस्त्यावर वाहने राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. या वाहनांवर कारवाई करावी.
भरधाव वाहनांवर कारवाई करा
कवठेमहांकाळ : शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्या तुलनेत वाहनांची संख्याही वाढत आहे. मात्र अनेक वाहनधारक रस्त्यावरून सुसाट वेगाने वाहने चालवतात. त्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
केरोसीनअभावी ग्रामीण भागात अडचण
आटपाडी : ज्या नागरिकांकडे सिलिंडर उपलब्ध आहे, अशा नागरिकांना केरोसीनचा पुरवठा करणे शासनाने बंद केले आहे. ग्रामीण भागात रात्रीच्या सुमारास विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढते. त्यावेळी दिव्याचा वापर करावा लागतो. मात्र केरोसीन बंद झाल्याने दिवा कसा लावावा, असा प्रश्न आहे. गॅस मिळाला असला, तरी थंडीच्या दिवसात अनेकजण चुलीवर पाणी गरम करतात.