शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

CoronaVirusInSangli : जिल्ह्यात आणखी सहाजणांना कोरोना, रुग्णसंख्या ६५ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 12:27 PM

जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ६५ झाली असून, ३८ जण बरे झाले आहेत. दरम्यान, सांगलीतील फौजदार गल्ली, मिरजेतील होळी कट्टा आणि गव्हाण येथील बाधितांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

ठळक मुद्दे जिल्ह्यात आणखी सहाजणांना कोरोना, रुग्णसंख्या ६५ वर सोहोलीचे दोघे, रेड, आटपाडी, पिंपरी, मिरज येथील रुग्णांचा समावेश

सांगली : जिल्ह्यातील आणखी सहाजणांचा कोरोना अहवाल बुधवारी रात्री पॉझिटीव्ह आला. सोहोली (ता. कडेगाव) येथील दोघांचा, तर रेड (ता. शिराळा), मिरजेतील हडको कॉलनी, आटपाडीतील गोंदीरा मळा, पिंपरी बुद्रुक (ता. आटपाडी) येथील प्रत्येकी एकाचा त्यात समावेश आहे.

जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ६५ झाली असून, ३८ जण बरे झाले आहेत. दरम्यान, सांगलीतील फौजदार गल्ली, मिरजेतील होळी कट्टा आणि गव्हाण येथील बाधितांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.मंगळवारी जिल्ह्यातील तिघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले असताना, बुधवारी एकाच दिवशी सहाजणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. शिराळा तालुक्यातील रेड येथे मुंबईहून पती-पत्नी आले होते. या दोघांना गावातील शाळेत कम्युनिटी क्वारंटाईन करण्यात आले होते.

सोमवारी त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यात ४२ वर्षीय महिलेला कोरोना झाल्याचे निदान मंगळवारी झाले होते, तर बुधवारी कोरोनाबाधित महिलेच्या ४९ वर्षीय पतीचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.कडेगाव तालुक्यातील सोहोली येथील मुंबईस्थित महिला कोरोनाबाधित झाली होती. या महिलेचे कु टुंब रविवारी गावाकडे आले होते. आरोग्य यंत्रणेने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांचे कडेगाव येथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केले होते. यापैकी तिचा चुलत सासरा आणि चुलत दीर या दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.दिल्लीहून मिरज येथील भारतनगर हडको कॉलनीत आलेल्या पती-पत्नी दोघांना मिरजेत दाखल करण्यात आले होते. त्यातील महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. आटपाडी तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथे अकोला येथून आलेल्या एकास, तर गोंदीरा मळा (आटपाडी) येथे मुंबईहून आलेल्या एकास कोरोनाची लागण झाल्याने आटपाडी तालुक्यात एकाच दिवशी दोन रुग्ण वाढले आहेत.अंत्री खुर्दचा तो निगेटिव्ह!शिराळा तालुक्यातील अंत्री खुर्द येथील ४२ वर्षीय व्यक्तीचे मुंबईत १२ मेरोजी घशातील स्रावाचे नुमने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे कळविण्यात आले होते. त्यानंतर प्रशासनाने या व्यक्तीला मिरज कोविड रुग्णालयात दाखल केले होते व तातडीने नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्याचा अहवाल आता निगेटिव्ह आला आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली