CoronaVirus :मांगले येथील खासगी डॉक्टरला कोरोना, जतमध्येही आढळला रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 13:34 IST2020-06-08T13:27:43+5:302020-06-08T13:34:41+5:30

शिराळा तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढच होत असून सोमवारी मांगले येथील खासगी डॉक्टरचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

CoronaVirus: A private doctor at Mangle found a patient in Corona, Jat | CoronaVirus :मांगले येथील खासगी डॉक्टरला कोरोना, जतमध्येही आढळला रूग्ण

CoronaVirus :मांगले येथील खासगी डॉक्टरला कोरोना, जतमध्येही आढळला रूग्ण

ठळक मुद्देमांगले येथील खासगी डॉक्टरला कोरोनाजतमध्येही आढळला रूग्ण

सांगली : शिराळा तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढच होत असून सोमवारी मांगले येथील खासगी डॉक्टरचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

त्याचबरोबर तालुक्यातील ६१ जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून यात मणदूर येथीलच ४५ जणांचा समावेश आहे. जत येथील खासगी बसचालकाच्या आईलाही कोरोनाचे निदान झाले आहे. या दोघांचे सोमवारी सकाळी अहवाल आले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील रूग्णांची संख्या १६८ झाली आहे.

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रकोप वाढताना दिसत असून रविवारी एकाच दिवसात दोन बाधित रुग्णांचा मृत्यू झाला तर एकाच दिवसात तब्बल सोळा नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. मणदूर ता शिराळा व आवंढी ता. जत येथील दोघांचा मृत्यू झाला आहे .

Web Title: CoronaVirus: A private doctor at Mangle found a patient in Corona, Jat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.