शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
5
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
6
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
7
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
8
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
9
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
10
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
11
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
12
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
13
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
14
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
15
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
16
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
17
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
18
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
19
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
20
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी

coronavirus : इस्लामपुरात एकाच कुटुंबातील ९ कोरोनाग्रस्त, सांगलीत घबराट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 13:18 IST

एकाच कुटुंबातील नऊ जणांना कोरोना झाल्याने जिल्हा हादरला आहे. त्यांच्यावर सांगलीच्या विलगीकरण कक्षामध्ये उपचार सुरू आहेत. 

सांगली - हज यात्रेहून आलेल्या इस्लामपुरातील चौघा कोरोनाबाधित भाविकांच्या कुटुंबातील आणखी पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे बुधवारी सकाळी स्पष्ट झाले. त्या पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली असून, जिल्ह्यातील अशा रुग्णांची संख्या नऊवर पोहोचली आहे.इस्लामपूर शहरातील एका कुटुंबातील चौघे सौदी अरेबिया येथे हज यात्रेला गेले होते. तेथून ते १३ मार्चरोजी परतले होते. त्यांना १४ दिवस ‘होम क्वारंटाईन’ करण्यास सांगितले होते. या कुटुंबात ३५ सदस्य असून, हज यात्रेहून परतलेल्यांचा घरातील सर्वांशीच संपर्क आला होता. त्यामुळे दि. १९ रोजी सर्वांची तपासणी करून त्यातील १८ जणांना सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या घशातील स्रावाचे नमुने पुण्याला पाठविण्यात आले होते. त्यातील चौघांचा अहवाल सोमवारी आला. त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वैद्यकीय पथकाने हालचाली करून या कुटुंबाच्या घराचा परिसर निर्जंतुक केला. बॅरिकेटस लावून तो बंदिस्त केला.बुधवारी सकाळी आणखी पाच जणांचा अहवाल मिळाला असून, तो पॉझिटिव्ह असल्याने पुन्हा खळबळ उडाली. एकाच कुटुंबातील नऊ जणांना कोरोना झाल्याने जिल्हा हादरला आहे. त्यांच्यावर सांगलीच्या विलगीकरण कक्षामध्ये उपचार सुरू आहेत. या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यासाठी वैद्यकीय पथक मंगळवारपासून सक्रिय झाले आहे. मात्र रुग्ण शोधण्याचे आव्हान या पथकापुढे आहे. इस्लामपूर शहरात मात्र घबराटीचे वातावरण आहे.     

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSangliसांगलीMaharashtraमहाराष्ट्र