CoronaVirus Lockdown :कोरोनाच्या लढाईत माणुसकीचे दर्शन, पोलीस दादाने दिला घासातील घास...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 11:53 AM2020-05-19T11:53:24+5:302020-05-19T11:54:57+5:30

कोरोनाच्या लढाईत उन्हातान्हात उभे राहून पोलीस सेवा बजावतायत. माणसांचा जीव वाचविण्याची एकच तळमळ त्यांच्या मनात आहे तर मुक्या प्राण्यांच्या जीवाचीही त्यांना काळजी लागून राहिलीय.

CoronaVirus Lockdown: The vision of humanity in the battle of Corona, the grass given by the police grandfather ... | CoronaVirus Lockdown :कोरोनाच्या लढाईत माणुसकीचे दर्शन, पोलीस दादाने दिला घासातील घास...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरात तयार केलेल्या तपासणी नाक्यावर कार्यरत असलेले पोलीस जवान रणजित कुंभार भुकेल्या श्वानांना जेवण देत आहेत

googlenewsNext
ठळक मुद्देपोलीस दादाने दिला घासातील घास...श्वानांच्या पिलांची भूक भागविण्याची तळमळ

सागर गुजर

सातारा : कोरोनाच्या लढाईत उन्हातान्हात उभे राहून पोलीस सेवा बजावतायत. माणसांचा जीव वाचविण्याची एकच तळमळ त्यांच्या मनात आहे तर मुक्या प्राण्यांच्या जीवाचीही त्यांना काळजी लागून राहिलीय.

सातारा पोलीस दलातील पोलीस व राज्यस्तरावरील यशस्वी धावपटू असलेल्या रणजित कुंभार या पोलीसदादाने वर्दीतील माणुसकी दाखवून दिली. दुपारच्या जेवणावेळी झाडाखाली भटके श्वान गोळा होताच त्यांनी आपल्या डब्यातील भाकर त्यांना देऊन त्यांची भूक शमवली. गेल्या आठवड्यापासून या श्वानांची भूक भागत आहे.

राज्यस्तरीय धावपटू असलेल्या रणजित कुंभार यांनी आपल्या अप्रतिम खेळाच्या जोरावर सातारा पोलीस दलाला अनेक मेडल मिळवून दिले आहेत. ते सध्या सातारा मुख्यालयात सेवा बजावतात.

शहरातील तपासणी नाक्यावर रणजित कुंभार हे एका दुपारी झाडाखाली डबा खोलून जेवायला बसले होते. त्यांनी डबा खोलताच श्वानाची तीन पिले गोळा झाली. रणजित यांनी त्यांना भाकरीचा तुकडा टाकला. ती आवडीने खाऊ लागली. या श्वानांना त्यांची इतकी सवय लागलीय की ती तिन्ही पिले रोज जेवणाच्या वेळेत येत असल्याने रणजित ज्यादा जेवण नेत आहेत. पोलीस दलातर्फे दिलेली बिस्किटेही त्यांनी या श्वानांना दिली.

मनुष्य हा प्रेमळ प्राणी आहे. मुक्या प्राणी मात्रांवर दया करावी, असे आपली संस्कृती सांगते. आपण कितीही थकलो अन् कामाच्या व्यापात असलो तरी पोटाची भूक भागवताना आजूबाजूच्या प्राण्यांकडेही लक्ष असावे. हे संस्कार आपल्या प्रत्येकावर आहेत. तेच संस्कार रणजित यांनी जपले आहेत.

सुरुवातीला भिणारे नंतर मित्र झाले...

रणजित कुंभार एका झाडाखाली दुपारच्यावेळी जेवणाचा डबा उघडून बसतात. पहिल्या दिवशी श्वानाची तीन पिले शेपटी हालवत त्यांच्या दिशेने पळत आले; परंतु मार बसेल या भीतीपोटी ते जवळ येत नव्हते. हा माणूस आपल्याला खाऊ देतोय म्हटलं की या श्वानांनी कुंभार यांच्याशी मैत्रीच केली. डबा उघडताच त्यांच्या भोवतीने ते गोळा होतात. आणि भूक शमवतात.
 

Web Title: CoronaVirus Lockdown: The vision of humanity in the battle of Corona, the grass given by the police grandfather ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.