CoronaVirus Lockdown : सोशल डिस्टंन्सिंगच्या अनुषंगाने टप्या टप्याने शिथिलतेचा निर्णय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 02:47 PM2020-05-09T14:47:58+5:302020-05-09T14:48:07+5:30

सध्या दुकाने उघडण्याची जी प्रक्रिया आहे त्याला जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीशी सांगड घालत कोरानाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होणार नाही यांची काळजी घेत टप्या टप्याने शिथिलता देणे आवश्यक आहे.

CoronaVirus Lockdown: Review of Social Distance, Decision to Loosen | CoronaVirus Lockdown : सोशल डिस्टंन्सिंगच्या अनुषंगाने टप्या टप्याने शिथिलतेचा निर्णय ?

CoronaVirus Lockdown : सोशल डिस्टंन्सिंगच्या अनुषंगाने टप्या टप्याने शिथिलतेचा निर्णय ?

Next

सांगली : राज्य शासन व केंद्र शासन यांच्या निर्देशानुसार सांगली जिल्हा ऑरेज झोन मध्ये आहे. यात ऑरेज झोनमधील जी काही दुकाने उघडण्याबाबतचे निर्देश आहेत त्यात शहरी भागात मॉल्स, बाजारपेठा व व्यापारी संकुल या ठिकाणी केवळ जीवनाश्यक वस्तू व सेवा पुरविणारी दुकाने उघडी ठेवावित व इतर दुकाने उघडण्यात येऊ नये असे निर्देश आहेत.

त्यानुसार शहरी भागामध्ये मॉल्स, बाजारपेठा व व्यापारी संकुल या ठिकाणी केवळ जीवनाश्यक वस्तू व सेवा पुरवणाऱ्या दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. सदरची कार्यवाही ही शासनाच्या निर्देशानुसार असून यामध्ये सांगली जिल्हा प्रशासनाने कोणतेही अधिकचे निर्बंध घातलेले नाहीत. असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले.

ग्रामीण भागामध्ये राज्य शासनानकडून कोणतेही निर्बंध  ठेवलेले नाहीत, केवळ मॉल्स बंद ठेवण्याबाबत निर्देश आहेत. ग्रामीण भागामध्ये मॉल्स व व्यापारी संकुल विशेषता नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागात सरसकट दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. सांगली जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या दुकानांना राज्य शासनाच्या निर्देशानुसार परवानगी देण्यात आलेली आहे.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले सध्या ज्या गोष्टीसाठी शिथिलता देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी येणाऱ्या सर्वसामान्य लोकांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी गर्दी टाळणे आवश्यक आहे त्याच्याशी सागंड घालतच पुढची प्रक्रिया करावी लागणार आहे.

जिल्हा प्रशासनाकडून कोणत्याही अतिरिक्त नियमांची अमंलबजावणी करण्यात आलेली नाही. राज्य शासनाने ज्या गोष्टीसाठी शिथिलता दिलेली आहे यामध्ये ज्या बाबी नमूद आहेत त्या सर्व बाबीना जिल्हा प्रशासनाकडून अनुमती देण्यात आलेली आहे. यापुढे ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात चर्चा करून सध्याची परिस्थिती आहे त्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, सध्या दुकाने उघडण्याची जी प्रक्रिया आहे त्याला जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीशी सांगड घालत कोरानाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होणार नाही यांची काळजी घेत टप्या टप्याने शिथिलता देणे आवश्यक आहे.

त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडे बाजारपेठा व व्यापारी संकुल या ठिकाणी दुकाने उघडण्यासाठी मागणी झाली आहे. त्याअनुषंगाने परवानगी देण्यात आलेल्या दुकानांमध्ये सोशल डिस्टंन्सिंगची काटेकोर अमंलबजावणी होते किंवा नाही यांची खात्री करून घेण्यात येईल.

कुठेही अनावश्यक गर्दी होत नाही व दुकानदारांनी योग्य ती खबरदारी घेतली आहे किंवा कसे. सॅनिटायझरचा वापर, हात धुण्यासाठी सोय करण्यात आली आहे किंवा नाही या गोष्टी पडताळून घेण्यात येतील. त्यानंतर सर्व व्यापारी असोशिएन यांच्याशी सविस्तर बैठक घेण्यात येईल.

त्यांचे काही विषेश प्रस्ताव असतील तेही विचारात घेण्यात येतील. आणि कोरोनाची आपल्या जिल्ह्यामधील सध्याची परिस्थिती याची सांगड घालून पुढे कशी शिथिलता देण्याबाबत लोकप्रतिनिधी व पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली पुढची कार्यवाही करण्यात येईल.

Web Title: CoronaVirus Lockdown: Review of Social Distance, Decision to Loosen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.