शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: सांगली जिल्ह्यात लॉकडाऊन गरजेचा, अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेणार - जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 06:38 IST

सध्या उपलब्ध असलेली साधनसाम्रगी, व्यवस्था पाहता, रुग्णसंख्या आवाक्याबाहेर जात आहे. रुग्णांना बेड न मिळणे, आॅक्सिजन व व्हेंटिलेटर न मिळणे अशा गोष्टी होत आहेत. साधनसामग्रीच्या तुटवड्यामुळे नियोजन करताना अडचणी येत आहेत.

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने ही साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊनची आवश्यकता आहे. याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे मत पालकमंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीबाबत जयंत पाटील यांनी सांगलीतील पत्रकारांशी आॅनलाईन संवाद साधला. जयंत पाटील म्हणाले, सध्या उपलब्ध असलेली साधनसाम्रगी, व्यवस्था पाहता, रुग्णसंख्या आवाक्याबाहेर जात आहे. रुग्णांना बेड न मिळणे, आॅक्सिजन व व्हेंटिलेटर न मिळणे अशा गोष्टी होत आहेत. साधनसामग्रीच्या तुटवड्यामुळे नियोजन करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे संसर्ग साखळी तुटणे महत्त्वाचे आहे. यापूर्वी केलेल्या लॉकडाऊनचा फारसा उपयोग झाला नाही. लोक कोरोनाबद्दल गाफील आहेत. सुरक्षित अंतराचे पालन करण्यास ते टाळाटाळ करीत आहेत.ते म्हणाले, प्रशासनाने खासगी रुग्णालये ताब्यात घेतली आहेत. पण, अनेक  रुग्णालयांमधील रुग्णांना मिळणाºया वागणुकीबद्दल तक्रारी येत आहेत. रुग्ण व नातेवाईकांत त्याबद्दल नाराजी आहे. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी अशा तक्रारींची शहानिशा करूनच संबंधितांवर कारवाई करावी. यासाठी जिल्ह्याची सेंट्रल मॉनिटरिंग सिस्टिम तयार करावी. रुग्णांनी बेड शोधत फिरण्यापेक्षा त्यांना या सिस्टिममधून रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था होणे आवश्यक आहे.मुंबईतील डॉक्टर्स, कर्मचारी बोलावणारजयंत पाटील म्हणाले, कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने सांगलीत मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यामुळे मुंबईतील डॉक्टर्स, परिचारिका, कर्मचारी यांना सांगलीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचबरोबर आॅक्सिजन, व्हेंटिलेटर्स यांचीही पुरेशी उपलब्धता व्हावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत.सामूहिक प्रयत्नातून कोरोनावर मात शक्यजयंत पाटील म्हणाले, सामूहिक प्रयत्नातून कोरोनावर मात करता येते. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी याकामी सहकार्य करावे. जिल्हाधिकाºयांसोबत फिरून मी परिस्थितीचा आढावा घेणार आहे. त्याचबरोबर संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यास प्राधान्य देणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSangliसांगलीJayant Patilजयंत पाटील