शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

CoronaVirus Lockdown :सांगलीतील फौजदार गल्ली सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 16:49 IST

सांगली शहरातील फौजदार गल्लीत राहणाऱ्या एका महिलेला कोरोना झाल्याचे स्पष्ट होताच मंगळवारी महापालिका यंत्रणेची धावपळ उडाली. तात्काळ फौजदार गल्लीचा परिसर सील करण्यात आला असून, औषध फवारणीसह रुग्णाच्या संपर्कातील लोकांचा शोध घेतला जात आहे. या परिसरात सर्वेक्षण मोहीम हाती घेतली जाणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांनी सांगितले.

ठळक मुद्देसांगलीतील फौजदार गल्ली सील नागरिकांच्या आरोग्य तपासणीची मोहीम हाती घेणार

सांगली : शहरातील फौजदार गल्लीत राहणाऱ्या एका महिलेला कोरोना झाल्याचे स्पष्ट होताच मंगळवारी महापालिका यंत्रणेची धावपळ उडाली. तात्काळ फौजदार गल्लीचा परिसर सील करण्यात आला असून, औषध फवारणीसह रुग्णाच्या संपर्कातील लोकांचा शोध घेतला जात आहे. या परिसरात सर्वेक्षण मोहीम हाती घेतली जाणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांनी सांगितले.दरम्यान, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर, पोलीस निरीक्षक अजय सिंदकर, नगरसेवक मंगेश चव्हाण यांनी फौजदार गल्लीला भेट देऊन, उपाययोजनांच्या सूचना केल्या.फौजदार गल्लीतील ४० वर्षांच्या महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेने तात्काळ फौजदार गल्लीकडे धाव घेतली.

वैद्यकीय अधिकारी डॉ. ताटे, डॉ. वैभव पाटील, डॉ. शबाना लांडगे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, स्वच्छता निरीक्षक अंजली कुदळे, धनंजय कांबळे, गणेश माळी, वैभव कांबळे यांच्यासह लिंक वर्कर्सचे पथक फौजदार गल्लीत दाखल झाले. तातडीने औषध फवारणी, धूर फवारणी हाती घेण्यात आली.

कोरोनाबाधित महिलेच्या घरातील तिघांना मिरजेतील कोविड रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्या संपर्कातील लोकांचा शोधही सुरू केला आहे. पोलिसांनी फौजदार गल्लीचा २०० मीटरचा परिसर बफर झोन म्हणून जाहीर केला आहे.बफर झोनचा परिसर सील करण्याची प्रक्रियाही सुरू केली होती. या झोनमधील नागरिकांच्या आरोग्य तपासणीची मोहीम बुधवारपासून हाती घेतली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली