म्हैसाळमध्ये कोरोनापाठोपाठ डेंग्यू, चिकुनगुण्याची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:29 IST2021-05-07T04:29:39+5:302021-05-07T04:29:39+5:30
गावात दररोज पंधरा ते वीस रुग्ण आढळून येत आहेत. गावातील डॉक्टर पेशी कमी आलेल्या रुग्णांना मिरज व सांगली येथे ...

म्हैसाळमध्ये कोरोनापाठोपाठ डेंग्यू, चिकुनगुण्याची साथ
गावात दररोज पंधरा ते वीस रुग्ण आढळून येत आहेत. गावातील डॉक्टर पेशी कमी आलेल्या रुग्णांना मिरज व सांगली येथे पुढील उपचारासाठी पाठवत आहेत. शहरात अशा रुग्णांवर तेथे उपचार करून बरे केले जात आहे.
एका रुग्णास जवळपास तीस हजार ते पन्नास हजार रुपयांपर्यंत खर्चाचा भुर्दंड सोसावा लागतो, तर चिकुनगुण्यामध्ये रुग्णाचे अंग दुखते. हा रुग्ण बरा होण्यास बराचसा कालावधी लागतो. त्यामुळे कोरोनापाठोपाठ गावात डेंग्यूची व चिकनगुण्याची साथ आल्याने गावात भीतीचे वातावरण आहे.
कोट
म्हैसाळमध्ये कोरोना रूग्णांच्या पाठोपाठ आता डेग्यू व चिकुनगुण्याचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. डेंग्यू व चिकुनगुण्या हे आजार डास चावल्याने होतात. त्यामुळे ग्रामस्थांनी आपण राहत असलेल्या जागी स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे.
-
डॉ. कार्तिक घोरपडे म्हैसाळ