कोरोनाची भीती, गैरसमज दूर करण्यासाठी मिळणार ‘विश्वास’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 01:46 PM2021-04-24T13:46:36+5:302021-04-24T13:48:22+5:30

Collector CoronaVIrus Sangli : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच कोरोना दहशतीमुळे जनमानसात भिती निर्माण झाली आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे येणारा आर्थिक ताण, आजाराची भीती, समज गैरसमजामुळे मानसिक आजारपण वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने ह्यविश्वास.. कोरोना सोबत जगण्याचा..! ह्ण हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे , अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

Corona's fear, 'faith' to dispel misconceptions! | कोरोनाची भीती, गैरसमज दूर करण्यासाठी मिळणार ‘विश्वास’!

कोरोनाची भीती, गैरसमज दूर करण्यासाठी मिळणार ‘विश्वास’!

Next
ठळक मुद्देकोरोनाची भीती, गैरसमज दूर करण्यासाठी मिळणार ‘विश्वास’!जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली माहिती

सांगली : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच कोरोना दहशतीमुळे जनमानसात भिती निर्माण झाली आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे येणारा आर्थिक ताण, आजाराची भीती, समज गैरसमजामुळे मानसिक आजारपण वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विश्वास.. कोरोना सोबत जगण्याचा..!  हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे , अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लोकांच्या मनावरही परिणाम होत आहे. यातून व्यसनाधीनता, कौटुंबिक वाद-विवाद वाढत असल्याचे चित्र आहे. कोरोनाविषयी अकारण भीती कमी व्हावी या हेतूने जिल्हा प्रशासनाने हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.

कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना याचा उपयोग होईल. या उपक्रम यशस्वी करण्यासाठी तज्ञ संस्था म्हणून इस्लामपूर येथील शुश्रुषा सल्ला, मार्गदर्शन व प्रशिक्षण संस्था काम करणार आहे. मनोमित्र हेल्पलाईन नंबर असून या योजनेअंतर्गत रुग्णांचे चिंता, उदासीनता, ताण तणाव अशा विविध मानसीक त्रासांचे निदान करून तज्ञ मोफत समुपदेशन सेवा देण्यात येणार आहेत.त्यामुळे याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 

Web Title: Corona's fear, 'faith' to dispel misconceptions!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.