शहरं
Join us  
Trending Stories
1
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
2
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
3
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
4
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
6
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
7
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
8
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
9
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
10
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
11
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
12
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
13
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!
15
रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
16
मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
17
देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा
18
अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत 
19
रेकी झाली... टार्गेट ठरले... पण लूट दुसऱ्याच दुकानात, तीन मित्रांच्या पहिल्याच चोरीचा शेवट पोलिस कोठडीत

corona virus - इस्लामपूर येथील कोरोनाबाधित कुटुंबाशी निकटवर्तीय महिलेला कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 18:42 IST

इस्लामपूर येथील कोरोनाबाधित कुटुंबाशी निकटवर्तीय असणाऱ्या एका महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही महिला ही इस्लामपूर येथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनमध्ये होती. सांगली जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या सद्यस्थितीत 22 आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली.

ठळक मुद्देइस्लामपूर येथील कोरोनाबाधित कुटुंबाशी निकटवर्तीय महिलेला कोरोनासंसर्गाची बाधा रोखण्यासाठी प्रयत्नांची शर्थ

इस्लामपूर/सांगली : इस्लामपूर येथील कोरोनाबाधित कुटुंबाशी निकटवर्तीय असणाऱ्या एका महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही महिला ही इस्लामपूर येथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनमध्ये होती. सांगली जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या सद्यस्थितीत 22 आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली.इस्लामपूर शहरात गेल्या चौदा दिवसांपूर्वी कोरोना विषाणूची बाधा झालेले चार रुग्ण सापडल्यानंतर अवघे शहर भीतीच्या छायेखाली गेले होते. त्यानंतर ही संख्या 22 पर्यंत गेल्याने सगळीकडे स्मशानशांतता पसरली होती; मात्र आरोग्य विभागाच्या जिगरबाज कामगिरीने या कोरोना संसर्गाचा पाडाव होण्यास सुरुवात झाल्याने शहरात आशावादी वातावरण निर्माण झाले होते. 

बंदिस्त करण्यात आलेल्या परिसरात १६०८ घरे असून, त्यातील ७६३१ व्यक्तींची दैनंदिन तपासणी करण्यासाठी आरोग्य सेवक, सेविका आणि आशा वर्कर यांची ३१ पथके अविरतपणे काम करत होती. तर होम क्वारंटाईनमध्ये असलेल्या व्यक्तींच्या घर भेटीसाठी १६ पथके कार्यरत होती. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील म्हणाले, तालुक्यात एकूण १०८ जण परदेशवारी करून आलेले नागरिक होते. या सर्वांचे अलगीकरण करण्यात आले होते. अद्याप २० जण अलगीकरणात आहेत.

प्रांताधिकारी नागेश पाटील, तहसीलदार रवींद्र सबनीस, उपजिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. नरसिंग देशमुख यांच्यासह गटविकास अधिकारी, नगरपालिका आरोग्य विभाग, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व डॉक्टर, कर्मचारी, आशा वर्कर कोरोना संसर्गाची बाधा रोखण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगलीislampur-acइस्लामपूर