भवानीनगर येथे कोरोना योद्ध्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:18 IST2021-07-16T04:18:57+5:302021-07-16T04:18:57+5:30

भवानीनगर (ता. वाळवा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आवारात दादासाहेब रसाळ व डॉ. राहुल गौर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. ...

Corona warriors felicitated at Bhavnagar | भवानीनगर येथे कोरोना योद्ध्यांचा सत्कार

भवानीनगर येथे कोरोना योद्ध्यांचा सत्कार

भवानीनगर (ता. वाळवा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आवारात दादासाहेब रसाळ व डॉ. राहुल गौर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरटे : भवानीनगर (ता. वाळवा) येथे निशिकांत भोसले-पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दादासाहेब रसाळ युवा मंचचे अध्यक्ष सागर शिंदे व त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी गावामध्ये कोरोना योद्ध्यांचा सत्कार केला. प्राथमिक आरोग्य केंद्र आवारात विविध फळांच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.

भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस, प्रांजली दूध संघाचे अध्यक्ष दादासाहेब रसाळ म्हणाले, निशिकांत भोसले-पाटील यांच्या प्रेरणेने कोरोनाच्या संकटामध्ये ज्यांनी आपला जीव धोक्यात घालून आपल्या कुटुंबाची काळजी घेतली, त्या आशा सेविका, गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नेहमी आपली सेवा बजावणारे वैद्यकीय अधिकारी राहुल गौर यांनी गावासाठी अत्यंत मोलाचे काम केले.

यावेळी माजी उपसरपंच डॉ. रमेश गोडसे, डॉ. राहुल गौर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी दादासाहेब युवा मंचचे अध्यक्ष सागर शिंदे, माजी उपसरपंच, सरपंच, डॉ. रमेश गोडसे, अक्षय गोडसे, जॉकी देशपांडे, अवधूत चंद, सचिन चंद, राजेश नलवडे, साहिल नदाफ, आकाश गोंदील, अण्णा कदम, प्रदीप शिंदे, संपत कळसे, विनायक इंगळे, सुजित चंद, अक्षय शिंगाडे, सूरज कोळी, आशा वर्कर्स सुनीता कळसे, आशा काटवटे, संगीता साळुंखे, राणी उकरंडे, मनीषा कीर्दकुडे आदी उपस्थित होते.

Web Title: Corona warriors felicitated at Bhavnagar