corona virus : सांगलीचे पोलिस अधिक्षक शर्मा कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 01:58 PM2020-09-17T13:58:08+5:302020-09-17T14:00:08+5:30

सांगलीचे पोलीस अधिक्षक सुहैल शर्मा यांनी कोरोनावर मात केली. गुरुवारी पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत कार्यालयात स्वागत केले यावेळी पोलीस बँड पथकाने ही संगीताच धून वाजवत शर्मा यांचे स्वागत केले.

corona virus: Sangli Superintendent of Police Sharma corona free | corona virus : सांगलीचे पोलिस अधिक्षक शर्मा कोरोनामुक्त

corona virus : सांगलीचे पोलिस अधिक्षक शर्मा कोरोनामुक्त

Next
ठळक मुद्देसांगलीचे पोलिस अधिक्षक शर्मा कोरोनामुक्त कर्मचार्‍यांकडून पुष्पवृष्टी : पोलिस बँडच्या संगीतावर स्वागत

सांगली : सांगलीचे पोलीस अधिक्षक सुहैल शर्मा यांनी कोरोनावर मात केली. गुरुवारी पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत कार्यालयात स्वागत केले यावेळी पोलीस बँड पथकाने ही संगीताच धून वाजवत शर्मा यांचे स्वागत केले.

जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून पोलीस अधीक्षक शर्मा सातत्याने फिल्डवर काम करतात. शासकीय बैठका, पोलीस दलातील नियोजन, कोरोनाच्या उपायोजना यासाठी ते प्रयत्न करत होते. पाच सप्टेंबर रोजी त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तेव्हापासून शर्मा यांच्यावर घरीच उपचार करण्यात आले.

बारा दिवसाच्या उपचारानंतर गुरुवारी ते कोरोनामुक्त होऊन कार्यालयात दाखल झाले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांनी त्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. तर पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. पोलीस बँडनेही संगीताच्या धुनीवर त्यांचे कार्यालयात स्वागत केले.

Web Title: corona virus: Sangli Superintendent of Police Sharma corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.