corona virus in sangli-सांगली जिल्हा हद्दीतील पेट्रोल व डिझेल विक्री बंद : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 05:16 PM2020-03-25T17:16:20+5:302020-03-25T17:17:21+5:30

कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याकरिता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्याच्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दि. २5 मार्च २०२० पासून ते दि. ३१ मार्च २०२० रोजीच्या रात्री १२ वाजेपर्यंत सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीतील सर्व पेट्रोल पंप धारकांना पेट्रोल व डिझेल विक्री बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

corona virus in sangli- Petrol and diesel sales close in Sangli district limits - Collector | corona virus in sangli-सांगली जिल्हा हद्दीतील पेट्रोल व डिझेल विक्री बंद : जिल्हाधिकारी

corona virus in sangli-सांगली जिल्हा हद्दीतील पेट्रोल व डिझेल विक्री बंद : जिल्हाधिकारी

Next
ठळक मुद्देसांगली जिल्हा हद्दीतील पेट्रोल व डिझेल विक्री बंद : जिल्हाधिकारीशहरात जीवनावश्यक वस्तूची घरपोच सेवा

सांगली : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याकरिता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्याच्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दि. २5 मार्च २०२० पासून ते दि. ३१ मार्च २०२० रोजीच्या रात्री १२ वाजेपर्यंत सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीतील सर्व पेट्रोल पंप धारकांना पेट्रोल व डिझेल विक्री बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोरोनो विषाणूचे संसर्ग रोखण्याकरीता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूच्या प्रसाराचे माध्यम पाहता सदर विषाणूची लागण एका संक्रमीत रूग्णाकडून अन्य व्यक्तीस / इसमास त्यांच्या संपर्कात आल्याने होते.

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याकरिता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्याच्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी पेट्रोल व डिझेल विक्री बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 43, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, कलम 34 मधील पोटकलम (ू) व (े), महाराष्ट्र शासन क्र. करोना 2020.प्र.क्र.58/आरोग्य6 दि. 14 मार्च 2020 नुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून जारी केला आहे.

या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधिताविरूध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 अन्वये तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईन व पुढील कारवाई करण्यात येईल, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.

शहरात जीवनावश्यक वस्तूची घरपोच सेवा

 कोरोना या विषाणूचा वाढता पादुर्भाव पाहता संपूर्ण सांगली जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचार बंदी कालावधीत नागरिकांची गैरसोय होवू नये.

यासाठी सांगली, मिरज व कुपवाड या शहरात सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाकडून जीवनावश्यक वस्तू (किराणा, भाजीपाला, दूध, औषध) घरपोच देण्याची सेवा करण्यात आलेली आहे. तरी नागरिेकांनी संचार बंदी काळात घराबाहेर पडू नये व या सेवेचा वापर करावा असे आवाहन जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.

संपर्क क्रमांक- औषधे -9325251555, किरकोळ किराणा-9823180070, भाजीपाला -9970555570, दुध -9822132222, इतर सेवेसाठी -9423871888
 

Web Title: corona virus in sangli- Petrol and diesel sales close in Sangli district limits - Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.