शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

corona virus :रूग्णाची फरफट करणाऱ्या रूग्णालयांना प्रशासनाची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 6:23 PM

महानगरपालिका क्षेत्रातील कोविड उपचारासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या रूग्णालयांनी दि. 9 ऑगस्ट रोजी ॲडमिट करून न घेतल्याची तक्रार एका रूग्णाच्या नातेवाईकांनी केली आहे. त्या अनुषंगाने सदर कालावधीमधील रूग्णालयांची बेड्स ची स्थिती व सदर रूग्णास वेळेवर डेडिकेटेड कोविड हॉस्पीटलमध्ये दाखल करून न घेणे याचा लेखी खुलासा जिल्हा प्रशासनाने संबंधित रूग्णांलयांकडून मागविला आहे

ठळक मुद्देरूग्णाची फरफट करणाऱ्या रूग्णालयांना प्रशासनाची नोटीसजबाबदार असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,

सांगली : सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील कोविड उपचारासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या रूग्णालयांनी दि. 9 ऑगस्ट रोजी ॲडमिट करून न घेतल्याची तक्रार एका रूग्णाच्या नातेवाईकांनी केली आहे. त्या अनुषंगाने सदर कालावधीमधील रूग्णालयांची बेड्स ची स्थिती व सदर रूग्णास वेळेवर डेडिकेटेड कोविड हॉस्पीटलमध्ये दाखल करून न घेणे याचा लेखी खुलासा जिल्हा प्रशासनाने संबंधित रूग्णांलयांकडून मागविला आहे.रूग्णांची हेळसांड कोणत्याही स्थितीत सहन केली जाणार नाही. अचानकपणे येणाऱ्या गंभीर स्थितीतील रूग्णांवर उपचार करण्यासाठी हॉस्पीटल्सनी काही बेड्स राखीव ठेवावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी वारंवार दिल्या आहेत. असे असतानाही दि. 9 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी 5 या कालावधीत एका रूग्णास कुल्लोळी रूग्णालय, भारती हॉस्पीटल, सेवासदन हॉस्पीटल, विवेकानंद हॉस्पीटल, मिशन हॉस्पीटल, सिव्हील हॉस्पीटल मिरज, मेहता हॉस्पीटल या सर्व रूग्णांलयांमध्ये ॲडमीट करून घेतले नाही. अशी तक्रार नातेवाईकांनी केली आहे.

वास्तविक रूग्णालयातील बेड्स ची अद्ययावत माहिती रूग्णांना उपलब्ध व्हावी म्हणून बेड मॅनेजमेंट सिस्टीम तयार करण्यात आली आहे. रूग्णालयांच्या मार्फत यामध्ये आयसीयु व जनरल वॉर्ड मधील बेड्स ची संख्या सातत्याने अद्ययावत केली जाते. तसेच जनरल वॉर्डमधील पॉझीटीव्ह रूग्ण व संशयीत रूग्ण यांच्या माहिती बाबतही दैनंदिन अहवाल घेण्यात येतो.

असे असतानाही अत्यावस्थ स्थितीतील रूग्णास सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत यातील एकाही हॉस्पीटलने ॲडमीट करून घेतले नाही या बाबीची गंभीर दखल घेऊन वरील सर्व रूग्णांलयांना नोटीस बजावण्यात आल्या असून यामध्ये जबाबदार असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनातर्फे नोडल अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली