corona virus : सांगली जिल्ह्यासाठी ७४ व्हेंटिलेटर्स मिळाले; ग्रामीण भागातील रुग्णालयांत सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 03:04 PM2020-09-07T15:04:09+5:302020-09-07T15:05:27+5:30

सांगली जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने गंभीर रूग्णांवर उपचारासाठी व्हेंटिलेटरची कमतरता पडत होती. आता जिल्ह्याकरिता शासनाकडून तसेच इतर विविध ठिकाणाहून ७४ व्हेंटिलेटर्स प्राप्त झाले आहेत.

corona virus: 74 ventilators received for Sangli district; Facilities in rural hospitals | corona virus : सांगली जिल्ह्यासाठी ७४ व्हेंटिलेटर्स मिळाले; ग्रामीण भागातील रुग्णालयांत सोय

corona virus : सांगली जिल्ह्यासाठी ७४ व्हेंटिलेटर्स मिळाले; ग्रामीण भागातील रुग्णालयांत सोय

Next
ठळक मुद्देसांगली जिल्ह्यासाठी ७४ व्हेंटिलेटर्स मिळालेग्रामीण भागातील रुग्णालयांत सोय

सांगली : जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने गंभीर रूग्णांवर उपचारासाठी व्हेंटिलेटरची कमतरता पडत होती. आता जिल्ह्याकरिता शासनाकडून तसेच इतर विविध ठिकाणाहून ७४ व्हेंटिलेटर्स प्राप्त झाले आहेत.

ग्रामीण भागातील रूग्णांना त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणीच उपचार मिळावेत याकरिता काही व्हेंटिलेटरचे ग्रामीण रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालये, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलना वाटप करण्यात आले आहे. यामुळे शहरी भागातील रूग्णांबरोबरच ग्रामीण भागातील रूग्णांनाही दिलासा मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले.

जिल्ह्यासाठी शल्यचिकित्सक ठाणे व धुळे यांच्याकडून प्रत्येकी १०, तर वर्धा येथून १५ व्हेंटिलेटर्स प्राप्त झाले आहेत. महानगरपालिका मुंबई यांच्याकडून १०, पीएम केअरमधून २५, नारायण हॉस्पिटल बेंगलुरू यांच्याकडून १ असे ७१, तर टाटा ट्रस्टकडून उपजिल्हा रूग्णालय इस्लामपूरसाठी ३ असे एकूण ७४ व्हेंटिलेटर्स प्राप्त झाले आहेत.

या व्हेंटिलेटर्सचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे ६, विवेकानंद हॉस्पिटल १, प्रकाश मेमोरिअल क्लिनिक इस्लामपूर २, आरळी हॉस्पिटल जत २, श्रीसेवा हॉस्पिटल आटपाडी ६, उपजिल्हा रूग्णालय कवठेमहांकाळ ३, म्हेत्रे हॉस्पिटल कवठेमहांकाळ २, उपजिल्हा रूग्णालय शिराळा ४, श्री हॉस्पिटल विटा २, ओम श्री हॉस्पिटल विटा २, सद्गुरू हॉस्पिटल विटा १, मयुरेश्वर हॉस्पिटल जत २, सांगळूरकर हॉस्पिटल इस्लामपूर २, कोविड सेंटर क्रीडा संकुल मिरज ५, दुधणकर हॉस्पिटल १, उपजिल्हा रूग्णालय इस्लामपूर ३, ग्रामीण रूग्णालय विटा ३, ग्रामीण रूग्णालय जत २, भारती हॉस्पिटल ५, घाडगे हॉस्पिटल ५, कुल्लोळी हॉस्पिटल ५, विवेकानंद हॉस्पिटल ३, वॉन्लेस हॉस्पिटल मिरज ४ असे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी दिली.

Web Title: corona virus: 74 ventilators received for Sangli district; Facilities in rural hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.