बिरनाळ स्कूलमध्ये रांगोळीतून कोरोना वीरांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:21 IST2021-01-14T04:21:46+5:302021-01-14T04:21:46+5:30

संजयनगर : येथील वसंतराव बंडूजी पाटील ट्रस्ट अप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूल येथे मकर संक्रांतीनिमित्त व कोरोना काळात ...

Corona Veer honored from Rangoli at Birnal School | बिरनाळ स्कूलमध्ये रांगोळीतून कोरोना वीरांचा सन्मान

बिरनाळ स्कूलमध्ये रांगोळीतून कोरोना वीरांचा सन्मान

संजयनगर : येथील वसंतराव बंडूजी पाटील ट्रस्ट अप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूल येथे मकर संक्रांतीनिमित्त व कोरोना काळात आपल्या कर्तव्यात तत्पर राहणाऱ्या कोरोना वीरांच्या सन्मानार्थ ३०० स्क्वेअर फुटाची रांगोळी साकारण्यात आली. शाळेतील कलाशिक्षक संदीप पवार व ज्योती चौगुले यांनी व शालेय विद्यार्थी यांच्या सहभागातून अवघ्या १३ तासामध्ये रांगोळी साकारली.

प्रतिवर्षी शाळेच्या वतीने असा उपक्रम करण्यात येतो. यापूर्वी शाळेने शांततेचे प्रतीक, देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, प्रदूषण मुक्ती, अमर ज्योत अशा विविध विषयावर मानवी प्रतिमेच्या माध्यमातून शाळेकडून समाजप्रबोधन करण्यात आले आहे. यासाठी प्राचार्य शारदा खोत, सर्व विभागप्रमुख सीमा सावंत, आशाराणी चौगुले, दिनेश कर्नाळे,हेमा खिमाणी उपस्थित होते. या उपक्रमासाठी वसंतराव बेंडोजी पाटील ट्रस्टचे अध्यक्ष समीर बबनराव बिरनाळे व संचालक सागर बबनराव बिरनाळे यांचे प्रोत्साहन लाभले. ही रांगोळी पाहण्यासाठी दि. १६ जानेवारीपर्यंत सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत खुली राहणार आहे. तरी नागरिकांनी याचा लाभ घ्या, असे आवाहन समीर बिरनाळे यांनी केले आहे.

फोटो-१३दुपटे१.२

फोटो ओळ : सांगलीतील अप्पासाहेब बिरनाळे स्कूलमध्ये साकारण्यात आलेली रांगोळी. छाया : सुरेंद्र दुपटे

Web Title: Corona Veer honored from Rangoli at Birnal School