कुपवाडमध्ये भाजी विक्रेत्यांची कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:20 IST2021-06-26T04:20:09+5:302021-06-26T04:20:09+5:30
कुपवाड : कुपवाडमध्ये महापालिकेतर्फे शुक्रवारी फेरीवाले व भाजी विक्रेत्यांच्या कोरोना चाचणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. यामध्ये ११८ जणांची चाचणी ...

कुपवाडमध्ये भाजी विक्रेत्यांची कोरोना चाचणी
कुपवाड : कुपवाडमध्ये महापालिकेतर्फे शुक्रवारी फेरीवाले व भाजी विक्रेत्यांच्या कोरोना चाचणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. यामध्ये ११८ जणांची चाचणी केली असून, सहाजण पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांनी दिली.
जिल्ह्यात कोरोना संसर्ग पुन्हा जोर धरू लागला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रातील सर्व चौकाचौकात बाजारातील फेरीवाले व भाजी विक्रेत्यांसह बाजारात फिरणाऱ्या लोकांची कोरोना चाचणी करण्यासाठी अँटिजन तपासणी पथके कार्यरत करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रभाग समिती क्र. ३ चे सहाय्यक आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेतर्फे शुक्रवारी फेरीवाले व भाजी विक्रेत्यांच्या कोरोना चाचणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. कुपवाडमधील आर.पी. पाटील चौकात अँटिजन तपासणी करण्यात आली. यामध्ये बाजारात ११८ जणांची चाचणी केली असून, सहाजण पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली आहे.