शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: सीमा बंद असतानाही 'ती' मुंबईहून पोहोचली सांगलीला; सोबत नेला 'कोरोना'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 16:30 IST

आजाराची लक्षणे आणि मुंबईहून आलेली पार्श्वभूमी पाहून त्यांना तातडीने मिरज येथील कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

ठळक मुद्देमुंबईहून आलेल्या तरुणीस निगडीत कोरोनामिरज रुग्णालयात दाखल : गावाच्या सीमा सील

शिराळा : निगडी (ता. शिराळा) येथे मुंबईहून आलेल्या तरुणीला कोरोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी सायंकाळी स्पष्ट झाले. संबंधित तरुणी आणि तिचा चुलत भाऊ १७ एप्रिलला मुंबईहून आले होते. तिच्या भावाचा चाचणी अहवाल अजून आलेला नाही. या दोघांसोबत सागाव येथील दोघांना मिरज येथील कोविड रुग्णालयात दाखल केले आहे. निगडी गावाची सीमा सील केली असून, त्यांच्या कुटुंबातील व संपर्कातील १२ जणांना मिरज येथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केले आहे.निगडी येथील २३ वर्षीय तरुणी व २७ वर्षीय तरुण हे चुलत बहीण-भाऊ दि. १७ एप्रिलरोजी मुंबईहून स्वत:च्या वाहनाने गावी आले होते. ताप आल्याने दोन दिवसांपूर्वी पहिल्यांदा त्यांच्यावर शिराळा येथील रुग्णालयात व नंतर इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार केले. मात्र दि. २३ रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

आजाराची लक्षणे आणि मुंबईहून आलेली पार्श्वभूमी पाहून त्यांना तातडीने मिरज येथील कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी त्यांचे घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. शुक्रवारी (दि. २४) सायंकाळी या तरुणीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.त्यानंतर प्रांताधिकारी नागेश पाटील, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील, सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी निगडी गावास भेट देऊन संपूर्ण गाव सील केले आहे.दरम्यान, सागाव येथील दोन कुटुंबातील ३० वर्षीय पुरुष व २७ वर्षीय महिलेला त्रास होऊ लागल्याने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले असता, त्यांनाही मिरज येथे पाठवण्यात आले आहे. त्यांच्या आजाराच्या लक्षणांवरून त्यांच्या घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहे. सागाव येथील रुग्णांनी कोठेही प्रवास केलेला नाही, असे सांगण्यात आले आहे.चौकशी सुरूनिगडीचे हे बहीण व भाऊ मुंबईहून इकडे कसे आले, त्यांना परवानगी कोणी दिली, याची चौकशी सुरू झाली आहे. त्यांना प्रशासनाने होम क्वारंटाईन केले होते. तरी त्यांचा काही जणांशी संपर्क आला आहे. यामुळे त्यांच्या संपर्कातील नागरिक, नातेवाईकांचा शोध सुरू आहे. त्यांच्यावर इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार केले होते. तेथीलही काहीजणांची चौकशी सुरू आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगलीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस