बोरगाव परिसरात कोरोना रुग्ण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:29 IST2021-04-09T04:29:15+5:302021-04-09T04:29:15+5:30

बोरगाव : वाळवा तालुक्यातील बोरगावसह परिसरातील गावा-गावात कोरोना रुग्ण सापडल्याने परिस्थिती गंभीर होत चालली आहे. जनतेतून मात्र याचे गांभीर्य ...

Corona patients grew in the Borgaon area | बोरगाव परिसरात कोरोना रुग्ण वाढले

बोरगाव परिसरात कोरोना रुग्ण वाढले

बोरगाव : वाळवा तालुक्यातील बोरगावसह परिसरातील गावा-गावात कोरोना रुग्ण सापडल्याने परिस्थिती गंभीर होत चालली आहे. जनतेतून मात्र याचे गांभीर्य घेतले जात नसल्याने प्रशासन हतबल झाले आहे.

गुरुवारी बोरगावमध्ये सहा, नवे खेड चार, बनेवाडी व गौंडवाडी येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आले आहेत. ही बाब पाहत यापूर्वीच्या पहिल्या लाटेत एकाच वेळी सर्व गावांत रुग्ण अपवादानेच सापडत होते. मात्र दुसऱ्या लाटेत रोज प्रत्येक गावात रुग्ण सापडत आहेत. ही बाब गंभीर असतानाही नागरिक रस्त्यावर बिनामास्क फिरत आहेत. बाजारपेठेत गर्दी दिसत आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी तर विविध कार्यक्रमही मोठ्या दिमाखात होताना दिसत आहेत. जे पाॅझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत ते गावातून मोकाट फिरत आहेत. यांना मात्र आवरण्याची सध्या अत्यंत गरज आहे. हीच परिस्थिती राहिली तर येणाऱ्या काळात कोरोना गंभीर रूप धारण करणार हे नक्की दिसत आहे.

Web Title: Corona patients grew in the Borgaon area