जिल्ह्यात कोरोना रुग्णांनी ओलांडला हजाराचा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:27 AM2021-04-21T04:27:48+5:302021-04-21T04:27:48+5:30

सांगली : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. मंगळवारी दुसऱ्या लाटेतील सर्वोच्च रुग्णसंख्येची नोंद झाली असून, दिवसभरात १०९० रुग्ण आढळून ...

Corona patients in the district crossed the thousand mark | जिल्ह्यात कोरोना रुग्णांनी ओलांडला हजाराचा टप्पा

जिल्ह्यात कोरोना रुग्णांनी ओलांडला हजाराचा टप्पा

googlenewsNext

सांगली : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. मंगळवारी दुसऱ्या लाटेतील सर्वोच्च रुग्णसंख्येची नोंद झाली असून, दिवसभरात १०९० रुग्ण आढळून आले, तर कोरोनाने १९ जणांचा बळी घेतला. महापालिका क्षेत्रात सर्वाधिक २०३, तर आटपाडी, मिरज आणि जत तालुक्यात शंभरहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. दिवसभरात ३६७ जणांनी कोरोनावर मात केली.

जिल्ह्यात आतापर्यंत ६३ हजार १७७ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ५२ हजार ८७७ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या ८३३१ सक्रिय रुग्ण आहेत. मंगळवारी महापालिका क्षेत्रात २०३ रुग्ण आढळून आले. त्यात सांगलीतील १३५, तर मिरजेतील ६८ रुग्णांचा समावेश आहे. कडेगाव तालुक्यात ८०, वाळवा ९७, जत १०२, खानापूर ९२, तासगाव तालुक्यात ९८, आटपाडीत १०५, पलूस ५६, कवठेमहांकाळ ५९, मिरज १४५, शिराळा तालुक्यात ५३ नव्या रुग्णांची भर पडली आहे. कोल्हापूर १९, सोलापूर ८, सातारा ७, मुंबई २, रत्नागिरी ३, बुलडाणा १ व कर्नाटकातील ३ असे परजिल्ह्यातील ४३ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत, तर कऱ्हाड येथील एक व सोलापूर येथील तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दिवसभरात कडेगाव, पलूसमधील प्रत्येकी एक, तासगाव, खानापूर, कवठेमहांकाळमधील प्रत्येकी तीन, मिरज व वाळवा तालुक्यातील प्रत्येकी दोन, तर महापालिका क्षेत्रातील ४ अशा १९ जणांचा मृत्यू झाला, तर ३६७ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या १५१२ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील १२६४ जण ऑक्सिजनवर, १६१ जण नाॅन इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर, ७५ जण हाय फ्लो नेेझल ऑक्सिजनवर, तर १२ जण इन्व्हेजीव व्हेंटिलेंटरवर आहेत.

चौकट

आतापर्यंतचे बाधित : ६३१७७

कोरोनामुक्त झालेले : ५२८७७

उपचाराखालील रुग्ण : ८३३१

आतापर्यंतचे मृत्यू : १९६९

चौकट

मंगळवारी दिवसभरात...

सांगली : १३५

मिरज : ६८

आटपाडी : १०५

कडेगाव : ८०

खानापूर : ९२

पलूस : ५६

तासगाव : ९८

जत : १०२

कवठेमहांकाळ : ५९

मिरज : १४५

शिराळा : ५३

वाळवा : ९७

Web Title: Corona patients in the district crossed the thousand mark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.