Corona infiltrates Sangli Collector's Office | सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचा शिरकाव

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचा शिरकाव

ठळक मुद्देसांगली जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचा शिरकावमहिला अधिकारी पॉझिटिव्ह जिल्हाधिकारी कार्यालयात खळबळ

 सांगली : जिल्हा परिषद, महापालिका, जिल्हा कारागृहानंतर आता जिल्हाधिकारी कार्यालयातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. एका महिला अधिकार्‍यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यातील सर्वच शासकीय, निमशासकीय कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला होता. पण गेल्या साडे तीन महिन्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय सुरक्षित होते.

अखेर मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातही कोरोना पोहोचला. एका वरिष्ठ महिला अधिकार्‍याला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत.

दरम्यान त्यांच्या संपर्कात आलेल्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान मंगळवारी दुपारपर्यंत महापालिका क्षेत्रात कोरोनाचे २० नवे रुग्ण सापडले आहेत.

गेल्या पंधरा दिवसापासून दररोज २०० ते ३०० रुग्ण सापडत आहेत. त्यामानाने मंगळवारचा दिवस थोडा दिलासा देणारा ठरला आहे.
 

 

Web Title: Corona infiltrates Sangli Collector's Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.