शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे नगरसेवक आले आॅनलाईन पहिल्याच प्रयोग यशस्वी : दंगा, गोंधळाला फाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 16:47 IST

पण आॅनलाईन सभेत मात्र मौनी सदस्यांनीही मौन सोडले होते. संचारबंदीमुळे अनेक नगरसेवकांची दाढी वाढलेली होती. त्यांचा लुक बदललेला होता. त्यावर  दाढीतील लुक चांगला दिसतो, अशी कमेंट खुद्द आयुक्तांसह सदस्यांनीही केली. 

शितल पाटील

सांगली : महापालिकेची सभा म्हटले की गोंधळ, दंगा, आरोप-प्रत्यारोप. पण कोरोनामुळे या गोंधळाला सोमवारी फाटा मिळाला. पहिल्यांदाच महापालिकेने झुम अ‍ॅपद्वारे आॅनलाईन सभा घेतली. सभेत ८० हून अधिक नगरसेवक, अधिकारी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे मौनी असलेल्या सदस्यांनीही आपले मौन सोडत प्रश्न उपस्थित केले.  महापालिकेच्या प्रत्येक सभेत कोणत्या ना कोणत्या विषयावरून गोंधळ ठरलेला असतो. कधी एकमेकांच्या अंडरस्टँडिंगने तर कधी अधिकारी, प्रशासनाला धारेवर धरण्यासाठी सभेत वादळी चर्चा होत असते. त्यातून सभेचे कामकाज अवघ्या काही मिनिटांतही आटोपल्याचे प्रकार घडले आहेत.

पण सोमवारी महापालिकेच्या सभेचे चित्र काही वेगळेच होते. कोरोनामुळे सर्वच नगरसेवक सध्या घरीच लॉकडाऊन झाले आहेत. या सर्व नगरसेवकांना झुम अ‍ॅपद्वारे एकत्र करून सभेचे कामकाज पार पडले.  सकाळी साडेअकरा वाजता सुरू झालेली सभा दुपारी सव्वा तीन वाजेपर्यंत चालली. प्रत्येक सदस्यांला बोलण्याची संधी देण्यात आली. त्यांचे प्रश्न ऐकून त्यावर आयुक्तांनी खुलासाही केला. जवळपास ८० नगरसेवक व अधिकाऱ्यांनी यात भाग घेतला. त्यासाठी सिस्टिम मॅनेजर नकुल जकाते यांनी मोठे योगदान दिले. 

मुख्यालयातील वसंतदादा सभागृहात महापौर, आयुक्त व नगरसचिव हे तिघेच उपस्थित होते. समोर स्क्रिनवर सर्व सदस्यांना एकत्र करण्यात आले होते. उपायुक्तापासून इतर अधिकारी त्यांच्या कार्यालयातून आॅनलाईन आले होते. यापूर्वीच्या महासभेत कधी बोलण्याची संधी न मिळालेल्या नगरसेवक, नगरसेविकांनीही प्रश्न उपस्थित केले. महासभेत केवळ निम्म्याहून अधिक सदस्य केवळ हजेरीपुरतेच आलेले असतात. पण आॅनलाईन सभेत मात्र मौनी सदस्यांनीही मौन सोडले होते. संचारबंदीमुळे अनेक नगरसेवकांची दाढी वाढलेली होती. त्यांचा लुक बदललेला होता. त्यावर  दाढीतील लुक चांगला दिसतो, अशी कमेंट खुद्द आयुक्तांसह सदस्यांनीही केली. 

 सोशल मिडीयावर लाईव्ह या सभेचे कामकाज महापालिकेच्या सोशल मिडीया पेजवरही लाईव्ह दाखविण्यात आले. त्यावर चांगल्या प्रतिक्रिया उमटल्या. नागरिक जागृती मंचचे जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर यांच्यासह अनेकांनी या उपक्रमाचे स्वागत करीत यापुढे सर्वच सभा लाईव्ह प्रसारित करण्याची मागणी केली. 

टॅग्स :onlineऑनलाइनSangliसांगलीMuncipal Corporationनगर पालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस