जिल्ह्यात ८८३ जणांना कोरोना; १५ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:27 IST2021-04-17T04:27:10+5:302021-04-17T04:27:10+5:30
गेल्या दोन दिवसांतील बाधितांच्या संख्येत शुक्रवारी घट जाणवली, तर मृतांचे प्रमाण मात्र वाढतेच आहे. त्यानुसार सांगलीत शहरातील ७, वाळवा ...

जिल्ह्यात ८८३ जणांना कोरोना; १५ जणांचा मृत्यू
गेल्या दोन दिवसांतील बाधितांच्या संख्येत शुक्रवारी घट जाणवली, तर मृतांचे प्रमाण मात्र वाढतेच आहे. त्यानुसार सांगलीत शहरातील ७, वाळवा तालुक्यातील दोन तर आटपाडी, कडेगाव, पलूस, मिरज आणि कुपवाड येथील प्रत्येकी एकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
आरोग्य विभागाच्यावतीने शुक्रवारी आरटीपीसीआर अंतर्गत २१३९ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ४८७ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर रॅपिड ॲन्टिजेनच्या १८७५ जणांच्या चाचणीतून ४२० जण बाधित आढळले आहेत.
उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येने ६ हजाराचा टप्पा पार केला असून सध्या ६०२५ जण उपचार घेत आहेत. त्यातील ९५१ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यात ८५६ जण ऑक्सिजनवर, तर ९५ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ५९,३०३
उपचार घेत असलेले ६०२५
कोरोनामुक्त झालेले ५१,३७४
आतापर्यंतचे एकूण मृत्यू १९०४
शुक्रवारी दिवसभरात
सांगली १५६
मिरज ४९
वाळवा १३९
खानापूर ७९
मिरज तालुका ७७
जत ७०
शिराळा ६९
कडेगाव ६८
आटपाडी ५६
कवठेमहांकाळ ४६
पलूस २३