जिल्ह्यात ३० जणांना कोरोना; एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:21 IST2021-01-14T04:21:37+5:302021-01-14T04:21:37+5:30

सांगली : जिल्ह्यात बुधवारी ३० जणांना कोराेनाचे निदान झाले. दिवसभरात कडेगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला आहे, तर १५ जण ...

Corona to 30 in the district; Death of one | जिल्ह्यात ३० जणांना कोरोना; एकाचा मृत्यू

जिल्ह्यात ३० जणांना कोरोना; एकाचा मृत्यू

सांगली : जिल्ह्यात बुधवारी ३० जणांना कोराेनाचे निदान झाले. दिवसभरात कडेगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला आहे, तर १५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका क्षेत्रातील बाधितांच्या संख्येत थोडी वाढ होताना १० जणांना कोराेना झाला आहे.

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येतील चढउतार कायम आहे. बुधवारी आटपाडी, मिरज, शिराळा आणि कडेगाव तालुक्यात एकाही बाधिताची नोंद झालेली नाही, तर कडेगाव तालुक्यातील उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील सात रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या २२८ रुग्णांपैकी ५२ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४१ जण ऑक्सिजनवर तर ११ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

आरोग्य विभागाच्या वतीने बुधवारी आरटीपीसीआरअंतर्गत २९७ जणांच्या नमुन्यांची चाचणी घेतली, त्यात २० जणांना कोरोनाचे निदान झाले आहे, तर रॅपिड ॲण्टीजेनच्या ७१८ जणांच्या नमुन्यांच्या चाचणीतून १० जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित ४७८६४

उपचार घेत असलेले २२८

कोरोनामुक्त झालेले ४५८९७

आतापर्यंतचे एकूण मृत्यू १७३९

बुधवारी दिवसभरात

सांगली ७

मिरज ३

तासगाव, जत प्रत्येकी ५

कवठेमहांकाळ ४

वाळवा ३

पलूस २

खानापूर १

Web Title: Corona to 30 in the district; Death of one