जिल्ह्यात १०४६ जणांना कोरोना; १८ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:18 IST2021-07-09T04:18:12+5:302021-07-09T04:18:12+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत गुरुवारी पुन्हा एकदा वाढ झाली. दिवसभरात १०४६ नवीन रुग्ण आढळले, तर परजिल्ह्यातील एकासह जिल्ह्यातील ...

जिल्ह्यात १०४६ जणांना कोरोना; १८ जणांचा मृत्यू
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत गुरुवारी पुन्हा एकदा वाढ झाली. दिवसभरात १०४६ नवीन रुग्ण आढळले, तर परजिल्ह्यातील एकासह जिल्ह्यातील १७, अशा १८ जणांचा मृत्यू झाला. ८७८ जण कोरोनामुक्त झाले. म्युकरमायकोसिसचा नवीन एक रुग्ण आढळला.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा हजारावर गेली आहे. जिल्ह्यातील १७ जणांचा मृत्यू झाला. त्यात सांगली ४, वाळवा, कवठेमहांकाळ प्रत्येकी ३, शिराळा २, खानापूर, तासगाव आणि मिरज तालुक्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.
आरोग्य विभागाने चाचण्यांचे प्रमाण वाढविताना आरटीपीसीआरअंतर्गत ३२८६ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली, त्यात ३२२ जण पॉझिटिव्ह आढळले, तर रॅपिड ॲन्टिजनच्या ९३६२ जणांच्या नमुने तपासणीतून ७४४ जण बाधित आढळले. उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ होत असून सध्या ९८६६ जण उपचार घेत आहेत. त्यातील ९९१ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील ८३५ जण ऑक्सिजनवर, तर १५६ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील एकाचा मृत्यू, तर नवे २० रुग्ण उपचारास दाखल झाले.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित १५३७९८
उपचार घेत असलेले ९८६६
कोरोनामुक्त झालेले १३९७१८
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ४२१४
पॉझिटिव्हिटी रेट ८.४३
गुरुवारी दिवसभरात
सांगली १३०
मिरज ४४
आटपाडी ४५
कडेगाव ११०
खानापूर ७७
पलूस ७८
तासगाव ७४
जत ६०
कवठेमहांकाळ ४१
मिरज तालुका ७४
शिराळा ५०
वाळवा २६३