शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सहकार आयुक्तांकडून सांगली जिल्हा बँकेच्या चौकशीचे आदेश, राजू शेट्टी यांनी दिली माहिती

By अशोक डोंबाळे | Updated: June 1, 2024 16:54 IST

कोल्हापूरचे विभागीय सहनिबंधकांना सूचना

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गैरव्यवहाराची आणि बँकेत झालेल्या आर्थिक अनियमिततेबाबत तातडीने चौकशी करण्याचे आदेश सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी विभागीय सहनिबंधक कोल्हापूर यांना दिले आहेत, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली. बँकेतील घोटाळ्याशी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईची मागणीही शेट्टी यांनी सहकार आयुक्तांकडे केली आहे.राजू शेट्टी म्हणाले, जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची आर्थिक वाहिनी आहे. या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कारभारावर काही दिवसांपासून प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बँकेच्या कामकाजात अनियमितता असून, अनेक घोटाळे झालेले आहेत. बँकेच्या संचालक मंडळाने व अधिकाऱ्यांनी केलेल्या कारनाम्यावर पांघरून घालण्याचा प्रकार सुरू आहे. सध्या झालेल्या घोटाळ्यामध्ये दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पावसाने झालेले नुकसान भरपाईचे पैसे राज्य शासनाकडून जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांकडे वर्ग झाले नाहीत. कर्मचाऱ्यांनी बोगस खाती काढून ते पैसे परस्पर काढले आहेत. ताळेबंद पत्रकात बोगसगिरी करून फेररफार केल्याचे दिसते. बँकेमध्ये राजकारण्यांनी दंडेलशाही चालू केल्याने गैरप्रकार वाढले आहेत. त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण राहिले नाही. मनमानी कारभारामुळे बँकेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे जिल्हा बँकेच्या कारभाराविरोधात वेळोवेळी तक्रार केली आहे, मात्र शासनाने कारवाईकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे दुष्काळग्रस्तांच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीवर कर्मचाऱ्यांनी डल्ला मारला आहे. याबाबत सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन दीपक तावरे यांनी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, कोल्हापूर यांना बँकेच्या गैरव्यवहाराची अधिनिस्त फिरत्या पथकामार्फत चौकशी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल कराजिल्हा बँक ही शेतकरी व कष्टकऱ्यांची बँक आहे. बँकेच्या गैरकारभारात जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, तसेच या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला आहे.

टॅग्स :SangliसांगलीbankबँकRaju Shettyराजू शेट्टी