शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

जयंत पाटील, राजू शेट्टी यांच्या श्रेयवादानेच ऊस दराची कोंडी!, शेतकऱ्यांना आर्थिक फटका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 13:17 IST

कारखान्यांच्या गळीत हंगामावरही परिणाम

सांगली : माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूर पॅटर्ननुसार सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी ऊस दर जाहीर करण्याची मागणी केली. कारखानदारांनी त्याकडे दुर्लक्ष केले. यावरून शेट्टी यांनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ताब्यात असलेल्या राजारामबापू कारखान्यावर ठिय्या मारला. येथे जयंतराव आणि शेट्टी यांच्यातील संघर्ष टोकाला गेल्यामुळे ऊस दराची कोंडी फुटण्याऐवजी शेतकऱ्यांचीच आर्थिक कोंडी निर्माण झाली.जिल्ह्यातील १९ साखर कारखान्यापैकी १८ कारखाने गळीत हंगाम घेत आहेत. या कारखान्यांसाठी एक लाख ३५ हजार ६८८.८ हेक्टर क्षेत्रावरील ऊस गळीतासाठी मिळणार आहे. गतवर्षीपेक्षा पाच हजार हेक्टरने उसाचे क्षेत्र घटले आहे. दुष्काळामुळेही उसाच्या उताऱ्यात घट येणार आहे. या सर्व समस्या कारखाना व्यवस्थापनासमोर आहेत. दुसऱ्या बाजूला उसाचे क्षेत्र कमी आणि साखरेला बाजारात जादा दर असतानाही कारखानदार जादा दर देण्यासाठी तयार नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदार एफआरपीवर प्रति टन ५० आणि १०० रुपये देण्यास तयार आहेत. पण, सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी कोल्हापूर जिल्ह्याचा पॅटर्न मान्य नसल्याचे जाहीर केले आहे. शेजारच्या जिल्ह्यातील कारखानदारांना जमत असेल तर सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनाच अडचण काय, असा सवालही शेतकरी करत आहेत. ऊस दराची कोंडी फोडण्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकाही कारणीभूत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. हातकणंगले लोकसभेच्या मैदानात राजू शेट्टी यांनी उतरणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. याच मैदानात जयंत पाटील यांचे चिरंजीव आणि राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांची चाचपणी चालू आहे. कोल्हापूर पॅटर्न सांगली जिल्ह्याने स्वीकारला तर राजू शेट्टी यांना श्रेय जाणार आहे. म्हणूनच जयंत पाटील आणि सांगली जिल्ह्यातील कारखानदार कोल्हापूर पॅटर्न मान्य करण्यास तयार नाहीत, असा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे. एकंदरीत काय तर जयंतराव आणि शेट्टी वादात शेतकऱ्यांची मात्र आर्थिक कोंडी होत आहे. नेत्यांनी राजकीय वाद बाजूला ठेवून ऊस दराची कोंडी फोडावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

काँग्रेस नेत्यांचीही गोचीकाँग्रेसचे नेते माजीमंत्री डॉ. विश्वजित कदम, काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील यांची राजू शेट्टी यांची चांगली गट्टी आहे. कदम, पाटील यांना कोल्हापूर पॅटर्न मान्य आहे. पण, शेट्टी यांना दुखवायचे नाही आणि जयंत पाटील यांच्याशी वैर घ्यायचे नाही, अशा मनस्थितीमध्ये कदम आणि पाटील आहेत. नेत्यांच्या या राजकारणात शेतकऱ्यांचे आर्थिक दिवाळे निघत असल्याच्या चर्चा सध्या शेतकऱ्यांमध्ये सुरू आहेत.

टॅग्स :SangliसांगलीsugarcaneऊसJayant Patilजयंत पाटीलRaju Shettyराजू शेट्टी