शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
4
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
5
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
6
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
7
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
8
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
9
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
10
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
11
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
12
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
13
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
14
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
15
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
16
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
17
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
18
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
19
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
20
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Politics: अजित पवार गटात पक्षांतर्गत संघर्ष उफाळला, पदाधिकारी निवडीवरून खल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 17:06 IST

ऐन निवडणुकीत पडलेली ही संघर्षाची ठिणगी किती भडकणार, याची चर्चा

पलूस : पलूसमधील राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाचे माजी क्षेत्राध्यक्ष प्रदीप कदम गटाला वगळून पदाधिकारी निवड केल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर दोन गटांत जुंपली आहे.जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी एकतर्फी व बिन विश्वासात घेता पक्षांतर्गत निवडी केल्याचा आरोप प्रदेश सरचिटणीस प्रताप पाटील यांनी पलूस येथील राष्ट्रवादी प्रदेश मेळाव्यात व्यक्त केला. यामुळे राष्ट्रवादीतच दोन गट असल्याचे व पक्षांतर्गत संघर्ष उफाळून आल्याचे स्पष्ट दिसून आले आहे.जर पक्षातील पदाधिकारी विश्वासात घेतले जात नसतील तर पलूस नगरपालिकेच्या निवडणुकीत स्वतंत्र लढावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी चक्क मेळाव्यात प्रदेश सरचिटणीस प्रताप पाटील व पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी अध्यक्ष प्रदीप कदम त्यांच्या समोरच ही खदखद व्यक्त केल्याने पलूस तालुक्यात राजकीय क्षेत्रात भूकंप आला आहे. या भूकंपाची चर्चा आता जिल्हाभर सुरू झाली आहे.प्रदेश सरचिटणीस प्रताप पाटील यांनी थेट जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यावर आरोप करत त्यांनाच अरोपीच्या पिंजऱ्यात उभा केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांत संभ्रमावस्था पाहायला मिळत आहे.मागील दोन वर्षांत पलूस तालुक्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद वाढवण्यासाठी प्रदीप कदम यांना जिवाचे राण केले पलूस-कडेगाव विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारून पक्षाला उर्जितावस्था आणल्याचा दाखला देत पाटील यांनी थेट कदमांची पाठराखण केली आहे.यामुळे पलूसमध्ये प्रदीप कदम विरुद्ध नीलेश येसुगडे असा नवा संघर्ष पेटला आहे.ऐन निवडणुकीत पडलेली ही संघर्षाची ठिणगी किती भडकणार, याची चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे. याचा फटका येसुगडे यांना बसणार का, हे आता पाहावे लागणार आहे.

पक्षासाठी मी प्रामाणिक काम केले आहे. त्यामुळे पक्षातील वरिष्ठ माझी योग्य दखल घेतील. - प्रदीप कदम, माजी राष्ट्रवादी क्षेत्र अध्यक्ष पलूस-कडेगाव 

निशिकांत पाटील हे पक्षाचे मालक व्हायचा प्रयत्न करत आहेत. या गोष्टींचा अहवाल वरिष्ठांकडे अहवाल सादर केला असून, नगरपालिका निवडणुकीनंतर योग्य निर्णय घेऊन उपेक्षितांना न्याय मिळवून देणार आहे. - प्रताप पाटील, प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी अजित पवार गट

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli NCP factionalism flares over appointments; internal conflict intensifies.

Web Summary : Sangli NCP's Ajit Pawar faction faces internal strife. Allegations of unilateral appointments have surfaced, causing division. Calls for independent Palus municipal elections highlight growing discontent. Senior leaders are urged to address grievances and ensure justice for neglected members.