शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

जलजीवनच्या थकीत बिलांसाठी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा ठेकेदारांचा निर्णय, उद्या राज्यभरात बैठका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 18:55 IST

शासनाविरोधात निर्णायक भूमिका घेणार

सांगली : जलजीवन योजनेच्या थकीत बिलांसाठी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा निर्णय ठेकेदार संघटनेने घेतला आहे. त्यासाठी त्यांची वेळ घेण्यात येत आहे. दरम्यान, थकबाकीचा आढावा घेऊन पुढील कार्यवाहीसाठी राज्यभरात रविवारी (दि. ३) ठेकेदारांच्या बैठका होणार आहेत.संघटनेने प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, तांदुळवाडी (ता. वाळवा) येथील ठेकेदार अभियंता हर्षल पाटील यांच्या आत्महत्येला १० दिवस लोटले, तरी शासकीय स्तरावर कोणत्याही हालचाली नाहीत. कंत्राटदारांच्या थकीत देयकांबाबत शासन हतबल स्थितीत दिसत आहे. बिले मिळण्यासाठी गेल्या आठ महिन्यांपासून राज्यभरात कंत्राटदार आंदोलने करत आहेत. धरणे, मोर्चा, उपोषण यांद्वारे शासनाकडे पाठपुरावा करत आहेत; पण शासन ढिम्म अवस्थेत आहे.महाराष्ट्रासारख्या पुरोगामी आणि प्रगत राज्याला हे शोभणारे नाही. यासंदर्भात मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे. त्यासाठी तीनवेळा पत्रे देऊनही वेळ देण्यात आलेला नाही. यामुळे अस्वस्थ झालेल्या ठेकेदारांनी राज्यातील सर्व ३५ जिल्ह्यांत रविवारी एकाचवेळी व्यापक बैठक बोलावली आहे. त्यामध्ये संबंधित जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास विभाग, जलजीवन मिशन व इतर विभागांतील प्रलंबित देयके व इतर प्रश्नांवर चर्चा केली जाईल. शासनाविरोधात ठोस निर्णय घेतला जाईल. महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ, राज्य अभियंता संघटना व महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना यांची ऑनलाइन बैठक गुरुवारी झाली. त्यावेळी संघटनेचे राज्य अध्यक्ष मिलिंद भोसले, सुनील नागराळे, संजय मैंद, निवास लाड, राजेश देशमुख, सुरेश कडू-पाटील यांच्यासह ठेकेदारांनी चर्चेत भाग घेतला.