शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या फसवणुकीमुळेच हर्षल पाटील यांची आत्महत्या - शशिकांत शिंदे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 19:38 IST

सरकार आर्थिक संकटात, तांदूळवाडीत पाटील कुटुंबीयांची भेट

सांगली : आमचा तो कंत्राटदारच नाही, असे सांगून सरकारने हात झटकले. मात्र, सरकारच्या चुकीच्या धोरणाने, बिले न देण्याच्या भूमिकेने कंत्राटदार हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली. याला सर्वस्वी सरकारच जबाबदार आहे, असे मत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले.पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्यासह शिंदे यांनी सोमवारी तांदूळवाडी (ता. वाळवा) येथील हर्षल पाटील यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, हर्षल पाटील यांनी आत्महत्या केल्यानंतर आजतागायत जिल्ह्यातील एकही शासकीय अधिकारी पाटील कुटुंबीयांच्या घरी फिरकला नाही. यावरून या सरकारची किती बेफिकिरी सुरू आहे, हे स्पष्ट होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही सुरूच आहेत.आता कंत्राटदार आत्महत्या करीत आहेत. सरकारने वेळेत कामाची बिले दिली असती तर हर्षल पाटील यांच्या आत्महत्येची घटना घडलीच नसती. पाटील यांच्या कुटुंबाला आधार देणे, मदत देण्याची भूमिका सरकारची असायला हवी होती. मात्र, त्यांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले. या घटनेला सर्वस्वी सरकार व त्यांच्या संबंधित खात्याचे मंत्रीच जबाबदार आहेत.

कंत्राटदारांना सतर्क केले होते : जयंत पाटीलसरकारने सर्व फसव्या योजना जाहीर केल्या होत्या. त्यामुळे त्याचे परिणाम सर्व घटकांवर होणार होते. कंत्राटदारांना जेवढी बिले मिळतील तेवढीच कामे करण्याबाबत सतर्क केले होते. मात्र, अनेक कंत्राटदारांनी मोठ्या प्रमाणावर कामे घेतली. सरकारने बिले न देता त्यांची फसवणूक केली, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

सरकार आर्थिक संकटातजयंत पाटील म्हणाले की, राज्यात पाच लाख कंत्राटदारांची बिले थकीत आहेत. सरकारने अनेक भूलथापा दिल्या, फसव्या घोषणा केल्या. अनेक कामांची उद्घाटने केली. आर्थिक अडचणीमुळे आता सरकार पैसे देत नाही. या सर्वांचा परिणाम शेतकरी, कंत्राटदार, उद्योजक यांच्यावर होत आहे. हर्षल पाटील हे उपकंत्राटदार होते. त्यांनी ज्या सरकारी कंत्राटदाराकडून काम घेतले त्यालाही सरकारने दाद दिली नाही.