ढालगाव पोलीस औटपोस्ट नियमित सुरू ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:26 IST2020-12-22T04:26:43+5:302020-12-22T04:26:43+5:30

कवठेमहांंकाळ पोलीस ठाण्याअंतर्गत ढालगाव पोलीस औटपोस्टचे कार्यक्षेत्र येते. या ठिकाणी एक सहायक पोलीस अधिकारी व तीन पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक ...

Continue Dhalgaon Police Outpost regularly | ढालगाव पोलीस औटपोस्ट नियमित सुरू ठेवा

ढालगाव पोलीस औटपोस्ट नियमित सुरू ठेवा

कवठेमहांंकाळ पोलीस ठाण्याअंतर्गत ढालगाव पोलीस औटपोस्टचे कार्यक्षेत्र येते. या ठिकाणी एक सहायक पोलीस अधिकारी व तीन पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक आहे. मात्र १५ ऑगस्ट व २६ जानेवारी, १ मे आदी दिवस वगळता हे औटपोस्ट क्वचितच उघडे असते. कोरोनाच्या काळात हे कार्यालय काही दिवस नियमित सुरू होते; मात्र आता हे बंद आहे.

ढालगाव हे कवठेमहांकाळ तालुक्यातील मोठी बाजारपेठ असणारे गाव आहे. सुमारे एकवीस गावांतील नागरिक खरेदीसाठी नियमित येथे येत असतात. येथील आठवडा बाजारासाठी, बिरोबा देवस्थानच्या दर्शनासाठी, महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील अनेक गावांतून नागरिक येत असतात. आता आठवडा बाजारही नियमित सुरू झाला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे.

तसेच परिसरात चोरीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. यामुळे ढालगाव येथील पोलीस औटपोस्ट नियमितपणे सुरू झाले, तर भुरट्या चोऱ्यांना आळा बसेल, अशी नागरिकांतून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

फोटो २१ ढालगाव ०१

Web Title: Continue Dhalgaon Police Outpost regularly