शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

जिल्ह्यातील ८३ गावांत दूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 11:49 PM

जिल्ह्यातील ८३ गावांत दूषित पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यातील ८३ गावांतील पाण्याचे १२५ नमुने दूषित आढळून आले असून टीसीएल पावडरचे १६६ नमुनेही निकृष्ट दर्जाचे सापडले आहेत. या टीसीएल पावडरमध्ये क्लोरिनचे प्रमाण ३० टक्केच्या पुढे असणे गरजेचे आहे. परंतु, तपासणी केलेल्या नमुन्यामध्ये ३० टक्केपेक्षा कमी क्लोरिनचे प्रमाण असल्यामुळे जिल्हा परिषदेकडून गावांना नोटिसा बजाविल्या आहेत. जिल्हा परिषदेकडून वारंवार पाण्याचे नमुने दूषित आढळून आलेल्या चोवीस गावांना पिवळे कार्ड दिले आहे.जिल्हा परिषदेकडून दर महिन्याला पाणी आणि टीसीएल पावडरच्या नमुन्यांची तपासणी केली जाते. जून २०१७ या महिन्यात जिल्ह्यातील गावांचे पाणी नमुने तपासणीसाठी घेतले होते. यामध्ये नऊ तालुक्यातील ८३ गावांतील १२५ पाण्याचे नमुने दूषित आढळून आले. आटपाडी तालुक्यातील खुद्द आटपाडी गावातील हजारो जनतेला दूषित पाणी प्यावे लागत आहे. तालुक्याच्या ठिकाणाबरोबरच १६ गावांतील २० पाण्याचे नमुने दूषित आहेत. आटपाडी तालुक्यातील ४३ गावांपैकी २७ गावातील टीसीएल पावडरचे नमुनेही निकृष्ट आढळले आहेत. टीसीएल पावडरमध्ये क्लोरिनचे प्रमाण ३० टक्के गरजेचे असताना, ते त्यापेक्षा कमी आढळून आले आहे. येथील ग्रामपंचायतींना टीसीएलचे प्रमाण जादा वापरण्याच्या जिल्हा परिषदेकडून सूचना दिल्या आहेत. मिरज तालुक्यातील माधवनगर, हरिपूर, बुधगाव, नांद्रेसह वीस गावांतील पाण्याचे नमुने दूषित आढळले आहेत. तसेच मिरज तालुक्यातील १२ गावांतील टीसीएल पावडरचे नमुने घेतले होते. त्यापैकी चार ठिकाणचे टीसीएल पावडरचे नमुने निकृष्ट आढळून आले आहेत. येथेही ग्रामपंचायतींना प्रमाणापेक्षा जादा टीसीएल पावडर वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत.जत तालुक्यातील १०, कवठेमहांकाळ १५, तासगाव १७, पलूस पाच, वाळवा १२, शिराळा १० आणि खानापूर तालुक्यातील १६ ठिकाणचे पाण्याचे नमुने दूषित आढळले आहेत. टीसीएल पावडरचे नमुनेही निकृष्ट आढळले आहेत. त्यामुळे जादा प्रमाणात टीसीएल पावडर पाण्यात वापरण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेकडून दिल्या आहेत. कडेगाव तालुक्यातील एकाही गावामध्ये पाण्याचे दूषित नमुने आढळून आले नाही.दरम्यान, जिल्ह्यातील काही ग्रामपंचातीकडून वारंवार दुषित पाण्याचा पुरवठा होवूनही त्याकडे जिल्हा परिषद प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नाही. त्यांच्यावर ठोस कारवाई होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.दूषित पाणी नमुने आढळलेली गावे...आटपाडी तालुका : आटपाडी, मिटकी, पुजारवाडी, देशमुखवाडी, पात्रेवाडी, कौठुळी, कुरूंदवाडी, विभूतवाडी, झरे, घरनिकी, कामत, घानंद, बोंबेवाडी, लेंगरेवाडी, करगणी, माळेवाडी, जत : लोहगांव, हळ्ळी, उटगी, उमदी, बेळोंडगी, बालगांव, कवठेमहांकाळ : आगळगांव, आरेवाडी, ढालगांव, अलकुड एस, कोकळे, बसप्पावाडी, धुळगांव, जायगव्हाण, मळणगांव, शिरढोण, लांडगेवाडी, मिरज : गुंडेवाडी, कदमवाडी, खंडेराजुरी, नांद्रे, कर्नाळ, माधवनगर, हरिपूर, बेळंकी, बुधगावं, बिसूर, काकडवाडी, बेडग, तासगाव : सावर्डे, वासुंबे, बलगवडे, पेड, नरसेवाडी, नागेवाडी, सावळज, पलूस : दुधोंडी, दह्यारी, तुपारी, सुर्यगांव, हजारवाडी, वाळवा : कोरेगांव, फाणेवाडी, येडेनिपाणी, भडकंबे, वाळवा, शिरगांव, जुनेखेड, बावची. शिराळा : आरळा, कणदूर, चिखली, भाटशिरगांव, शिरसटवाडी, शेडगेवाडी, बिळाशी, मांगरूळ. खानापूर : पारे, वाझर, आळसंद, कळंबी, लेंगरे, भेंडवडे, साळशिंगे, करंजे.