काश्मिरात अडकलेल्या ६१ जणांशी संपर्क
By Admin | Updated: September 14, 2014 00:14 IST2014-09-14T00:09:00+5:302014-09-14T00:14:56+5:30
जम्मू-काश्मीर येथे पुरामध्ये सांगली जिल्ह्यातील अडकलेल्या लोकांसाठी

काश्मिरात अडकलेल्या ६१ जणांशी संपर्क
सांगली : जम्मू काश्मीर येथे पुरामध्ये सांगली जिल्ह्यातील अडकलेल्या लोकांसाठी व त्यांच्या नातेवाईकांसाठी जिल्हा प्रशासनाने सुरु केलेल्या नियंत्रण कक्षामार्फत दर २ तासांनी जम्मू काश्मीर प्रशासनाशी तसेच पुरात अडकलेल्या लोकांशी संपर्क साधण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी आज (शनिवार) येथे सांगितले. आज आखणी ६१ लोकांशी संपर्क साधण्यात यश आल्याचेही ते म्हणाले.
जम्मू काश्मीरच्या पुरामध्ये सांगली जिल्ह्यातील अडकलेल्या ६३ लोकांशी संपर्क झाला असून, ते सुखरूप आहेत.
उर्वरित ३८ लोकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असून, याबाबत जम्मू काश्मीर प्रशासनाशी सांगली जिल्हा प्रशासन संपर्कात आहे. सांगली जिल्ह्यातून काश्मीरमध्ये गेलेल्या कुटुंबियांच्या नातेवाईकांनी प्रशासनाशी संपर्क साधावा. त्याच बरोबर त्यांचा संपर्क नंबर असल्यास तो प्रशासनाकडे सादर करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)