शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

शिराळा नगरपंचायत उभारले दोन मियावकी जंगल प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 10:44 AM

Muncipal Corporation shirala Sangli- संपूर्ण राज्यात सुरू असलेल्या माझी वसुंधरा अभियानामध्ये शिराळा नगरपंचायतीने दोन मियावकी जंगल निर्मिती प्रकल्प समाविष्ट केले आहेत. प्लॅनेट अर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून उभे राहिलेले हे दोन्ही प्रकल्प शिराळा शहरास वरदान ठरत आहेत.शिराळा नगरपंचायत ही मियावकी जंगल निर्मिती प्रकल्प माझी वसुंधरा अभियान मध्ये समाविष्ट करणारी राज्यातील पहिली नगरपंचायत ठरली आहे.

ठळक मुद्देशिराळा नगरपंचायतीची माझी वसुंधरा अभियान अंतर्गत प्लॅनेट अर्थ फाउंडेशनच्या सहकार्याने उभारले जंगल प्रकल्प

विकास शहा

शिराळा- संपूर्ण राज्यात सुरू असलेल्या माझी वसुंधरा अभियानामध्ये शिराळा नगरपंचायतीने दोन मियावकी जंगल निर्मिती प्रकल्प समाविष्ट केले आहेत. प्लॅनेट अर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून उभे राहिलेले हे दोन्ही प्रकल्प शिराळा शहरास वरदान ठरत आहेत.शिराळा नगरपंचायत ही मियावकी जंगल निर्मिती प्रकल्प माझी वसुंधरा अभियान मध्ये समाविष्ट करणारी राज्यातील पहिली नगरपंचायत ठरली आहे.जपानचे प्रसिद्ध वनस्पतीशास्त्रज्ञ डॉक्टर अकिरा मियावकी यांनी निश्चित केलेल्या पद्धतीनुसार हे प्रकल्प उभा करण्यात आले आहे. या दोन्ही प्रकल्पांमध्ये ६५ पेक्षा जास्त स्थानिक देशी प्रजातींच्या झाडांचा समावेश केला आहे. तसेच यामध्ये देशी औषधी, मसाल्याचे, फळांचे, फुलांचे विविध जाती आहेत.

या प्रकल्पामध्ये एकूण १७०० पेक्षा जास्त झाडांची यशस्वी लागवड करण्यात आली आहे. हा प्रकल्प उभारणे आणि संवर्धनाचे काम प्लॅनेट अर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश पाटील , उपाध्यक्ष प्रणव महाजन यांचे मार्फत सातत्याने होत आहे.पहिला प्रकल्प डॉ. नितीन जाधव आणि दुसरा डॉ. दीपक यादव यांचे खाजगी जागेत उभारण्यात आला आहे. मियावकी जंगल प्रकल्प मध्ये शंभर वर्षात तयार होणारे नैसर्गिक जंगल दहा वर्षात तयार होत असते. २०१९ साली सुरू केलेल्या पहिल्या प्रकल्पातील सर्व झाडांची उंची वीस ते पंचवीस फूट इतकी आहे. २०२० साली सुरु केलेल्या दुसऱ्या प्रकल्पातील झाडांची उंची सहा ते सात फूट आहे.

अत्यंत कमी कालावधीत झाडांची एकमेकांमध्ये स्पर्धा लावून हे जंगल शास्त्रीय पद्धतीने तयार केलेले आहे. या जंगलामुळे शिराळा शहरातील वायू प्रदूषण घटण्यास मदत होत आहे, तसेच पक्ष्यांचा अधिवास तयार होणे, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढणे, विहिरी, बोर यांना मुबलक पाणी उपलब्ध होणे, जमिनीची धूप थांबणे, सौंदर्यीकरण असे अनेक कायमस्वरूपी फायदे या मियावकी जंगल प्रकल्पाच्या माध्यमातून होत आहेत.

यामुळे नगरपंचायतचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. नगरपंचायत मार्फत मियावाकी जंगलच्या संगोपनासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टीचा पुरवठा होत आहे. तसेच अशा प्रकारचे अनेक प्रकल्प राज्यात उभे रहावेत आणि पर्यावरणाचे संवर्धन व्हावे असे मत नगराध्यक्षा सुनिता निकम,उपनगराध्यक्ष विजय दळवी मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी व्यक्त केले आहे 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाshirala-acशिराळाSangliसांगली