शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

सांगलीत कॉंग्रेस कार्यकर्ते-पोलिसांत झटापट, लाठीमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 16:27 IST

या आंदोलनावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. गॅसची एक मोठी प्रतिमा तयार करून त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र लावण्यात आले होते. दुस-या बाजुस कॉंग्रेसच्या नेत्यांसह गॅसदरवाढीचा निषेध करणारा फलक लावण्यात आला होता.

ठळक मुद्देगॅसदरवाढीविरुद्ध आंदोलनावेळी घटना : १२ कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई

सांगली : गॅस दरवाढीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना गुरुवारी पोलिसांनी धक्काबुक्की करून लााठीमारही केला. जवळपास १२ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

 

अखिल भारतीय युवक कॉंग्रेसचे महासचिव हरपाल सिंग, महाराष्टÑाचे सहप्रभारी गौरव सिमाले युवक कॉंग्रेसचे प्रदेश महासचिव जयदीप शिंदे आणि सांगलीचे जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सांगलीच्या कॉंग्रेस भवनासमोर गुरुवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास गॅस दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. गॅसची एक मोठी प्रतिमा तयार करून त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र लावण्यात आले होते. दुस-या बाजुस कॉंग्रेसच्या नेत्यांसह गॅसदरवाढीचा निषेध करणारा फलक लावण्यात आला होता. पोलिसांनी आंदोलनास मज्जाव केला. तरीही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत आंदोलनास सुरुवात केली. जवळपास तिनशे ते चारशे युवक कार्यकर्ते रस्त्यावर आल्याने आंदोलनाची तीव्रता अधिक वाटत होती. पोलिसांनी त्यामुळे आंदोलन न करण्याची सूचना केली.

कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार व मोदींच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. इतक्यात पोलिसांनी कार्यकर्त्यांना रस्त्यावरून कॉंग्रेस भवनाकडे ढकलण्याचा प्रयत्न केला. यावेळी जोरदार झटापट झाली. पोलिसांनी कार्यकर्त्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी काही कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. आंदोलनात इंद्रजित साळुंखे, संदीप जाधव, जयदीप भोसले, संभाजी पाटील, राजू वलांडकर, सुरेश बलबंड, सुधीर लकडे, प्रमोद जाधव, सौरभ पाटील, उदय थोरात आदी सहभागी झाले होते.पोलिसांची भूमिका अनाकलनीयआंदोलनाची आम्ही रितसर परवानगी काढली होती. शांततेने व लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू असताना पोलिसांनी अशाप्रकारे धक्काबुक्की व लाठीमार करणे अयोग्य आहे. आंदोलन दडपण्याचे नियोजन पोलिसांनी अगोदरपासून केले होते, अशी टीका जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण यांनी यावेळी केले.

 

टॅग्स :Sangliसांगलीcongressकाँग्रेस