शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

सांगलीत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा, एकमेकाला टोमणे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 12:04 IST

अपक्षांना मत देणे धोक्याचे : जयंत पाटील

सांगली : सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत निर्माण झालेल्या संघर्षावर काँग्रेस, उद्धवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला होता. उमेदवारी मागील राजकारणात काहीही संबंध नसल्याचे सांगून दोषमुक्त होण्याचा राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रयत्न केला. काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम यांनी व्यासपीठावर उमेदवारी वाटपाच्या राजकारणावर खंत व्यक्त केली. उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची जागा कशी बरोबर आहे, हे ठणकावून सांगितले.पहिल्या दिवशी मला जर समजलं असतं की सांगली विश्वजीत कदम यांच्यासाठी सोडायची आहे तर मीसुद्धा ही जागा सोडली असती. इथल्या भविष्याच्या आड शिवसेना अजिबात येणार नाही. आपल्या विचाराकडून हिसकावून घेतलेली जागा जिंकण्यासाठी आम्ही सांगलीत आलोय, असे ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकमेकांवर शालूतून जोडे मारल्यानंतर आघाडीचा उमेदवार निवडून आणण्याच्या आणाभाका व्यासपीठावरून मतदारांना दिल्या. त्यानंतर व्यासपीठावरून नेते निघून जाताच, नेत्यांच्या भाषणांची कार्यकर्त्यांची चांगलीच चर्चा रंगली होती.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला दममहाविकास आघाडीचे काम एकमुखी सुरू आहे. सांगलीत मात्र तसं झालं नाही. जागावाटप प्रत्येक पक्षाचा निर्णय होता. भाजपला जर हरवायचे असेल तर आता लढाईची दिशा बदलून चालणार नाही. आपण ताकदीने चंद्रहार पाटील यांचेच काम करायला पाहिजे. लोक काय म्हणतात, यापेक्षा सदसद्विवेक बुद्धी जागृत ठेवून काम करायला पाहिजे. राष्ट्रवादीच्या माझ्या कार्यकर्त्यांनी काही गडबड केली तर त्यांना माझा शेवटचा रामराम समजावा, असा इशाराही जयंत पाटील यांनी दिला.

अपक्षांना मत देणे धोक्याचे : जयंत पाटीलमराठी माणसांनी उभारलेले पक्ष फोडण्याचे काम केलेल्या भाजपला त्यांची जागा दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. नवनीत राणा यांना आम्ही निवडून दिले, त्या दुसऱ्या दिवशी भाजपमध्ये गेल्या. त्यामुळे अपक्षांना मत देणे धोक्याचे आहे, ते कधी कुठं जातील सांगता येत नाही. मी महाविकास आघाडीच्या जागा वाटपात कुठंही नव्हतो, पण वारंवार माझं नाव घेतलं जातं. माझा कुठंही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिले.

स्टेजवर एक, खाली एक नकोकुणाची तरी इच्छा होती, ती मान्य झाली नाही, परंतु आता महाविकास आघाडीचा उमेदवार उभा आहे. आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे रहावे, स्टेजवर एक आणि खाली एक अशी भूमिका घेतलेली चालणार नाही. राष्ट्रवादीतील लोकांनी शिवसेनेचे काम करायचे तरच पक्षात राहायचं... अन्यथा माझा त्यांना शेवटचा नमस्कार समजावा, असा इशारा जयंत पाटील यांनी दिला.

टॅग्स :Sangliसांगलीsangli-pcसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीVishwajeet Kadamविश्वजीत कदमJayant Patilजयंत पाटील