शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

कॉँग्रेस, राष्ट्रवादीला यंदा बाद करा

By admin | Updated: February 19, 2017 23:16 IST

सुधीर मुनगंटीवार : खरसुंडीत भाजपच्या उमेदवारांची प्रचार सभा

आटपाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी करुन जशा हजार, पाचशेच्या नोटा बाद केल्या, तसेच या निवडणुकीत ‘एक्स्पायरी डेट’ झालेल्या कॉँग्रेस-राष्ट्रवादीला बाद करा व भाजपच्या सर्व उमेदवारांना साथ द्या. आटपाडी तालुक्याच्या सर्व विकास कामांसाठी शासनाची तिजोरी खुली करेन, अशी ग्वाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे दिली.भाजपच्या जि. प. आणि पं. स.च्या उमेदवारांच्या प्रचारासाठी खरसुंडी (ता. आटपाडी) येथे रविवारी मुनगंटीवार यांची सभा आयोजित करण्यात आली होती, या सभेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. भाजपचे नेते गोपीचंद पडळकर उपस्थित होते. मुनगंटीवार म्हणाले, तुमच्या तालुक्यातील रस्त्यांसाठी वाट्टेल तेवढा निधी देतो. शेतकऱ्यांना फक्त पाणी देण्याची गरज आहे. आम्ही ७ हजार २७२ कोटी एवढा निधी गेल्यावर्षी सिंचनासाठी दिला. एवढा निधी गेल्या १५ वर्षात कधीही दिला गेला नव्हता. या निवडणुकीत कॉँग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करा. आटपाडी तालुक्यातील शेतीसाठी सिंचन, रस्ते, एमआयडीसी यासह सर्व विकास कामांसाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी राहीन.राजेंद्रअण्णा देशमुख म्हणाले, आता आपण पाण्यासाठी एकत्र आलो, तर राष्ट्रवादीच्या नेत्यांना दु:ख होऊ लागले आहे. १७ वर्षात त्यांनी किती प्रेम दिले? माझे बंधू अमरसिंहांना उभे करून त्यांनीच पाडले. हे पॅकेज त्यांनी दिले. आपली प्रगती पाण्याच्या प्रश्नामुळे थांबली आहे. भाजपचे नेते दिलेला शब्द पूर्ण करतात, हा माझा अनुभव आहे. यावेळी पडळकर म्हणाले, अर्थमंत्र्यांनी आटपाडी तालुका दत्तक घ्यावा. या निवडणुकीत भाजप सर्व जागा जिंकणार आहे. त्यानंतरही तुम्ही तालुक्यावर कायमस्वरुपी लक्ष ठेवून विकास कामांसाठी पाठिंबा द्यावा.यावेळी खरसुंडी जि. प. गटाचे भाजप पुरस्कृत उमेदवार ब्रह्मदेव पडळकर, अरुण बालटे, रुपेशकुमार पाटील, वंदना गायकवाड, तानाजी यमगर, दादासाहेब मरगळे, पुष्पलता जावीर, भूमिका बेरगळ, भाऊसाहेब गायकवाड उपस्थित होते. (वार्ताहर)