काँग्रेस, राष्ट्रवादी, फुटीर तुपाशी, भाजप मात्र उपाशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:29 IST2021-09-22T04:29:56+5:302021-09-22T04:29:56+5:30
स्थानिक विकास निधीतून प्रत्येक नगरसेवकाला २५ लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली होती. पण भाजप वगळता काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपच्या ...

काँग्रेस, राष्ट्रवादी, फुटीर तुपाशी, भाजप मात्र उपाशी
स्थानिक विकास निधीतून प्रत्येक नगरसेवकाला २५ लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली होती. पण भाजप वगळता काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपच्या सात फुटीर नगरसेवकांसाठी स्वतंत्र हेडखाली आणखी ४० लाखांचा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे या नगरसेवकांना ६५ लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. तर भाजपा सदस्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत. महापौर निधीसाठी ५ कोटी, उपमहापौरांसाठी २.२५ कोटी, विरोधी पक्षनेत्यासाठी १.७५ कोटी, तर भाजपा सभागृहनेते, स्थायी समिती सभापतींना एक कोटीची तरतूद केली आहे. निधीतील असमान वाटपामुळे भाजपामध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
चौकट
अंदाजपत्रकात ३७ कोटींची वाढ
महापालिकेच्या अंदाजपत्रकाने नेहमीप्रमाणे यंदाही कोटीच्या कोटी उड्डाणे घेतले आहेत. स्थायी समितीने ४४ कोटी आणि आता महासभेने ३७ कोटी रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे यंदाचे बजेट ७९१ कोटी रुपयांपर्यंत गेले आहे. महापालिकेचे प्रत्यक्षातील उत्पन्न व अंदाजपत्रकातील आकडेवारीचा कुठेच ताळमेळ बसत नाही. पालिकेचे उत्पन्न दोनशे ते अडीचशे कोटीच्या घरात आहे. त्यामुळे उर्वरित पाचशे कोटींचा हिशेब कसा घालणार, शहरात विकासकामे होणार का? हे प्रश्न अनु्त्तरितच आहेत.
चौकट
महासभेच्या तरतुदी
पॅचवर्कच्या कामासाठी २५ लाख
थोर पुरुषांचा पुतळा स्मारक देखभाल दुरुस्ती : २५ लाख
टेलिफोन, गॅसपाईपलाईन चर दुरुस्ती : ७ कोटी
ड्रेनेज चर दुरुस्ती : २५ लाख
उपनगरात डांबरी रस्ते : ८ कोटी
गणेश तलाव सुशोभीकरण : १ कोटी
काळी खण विकसित करणे : १ कोटी
घनकचरा व्यवस्थापन : २ कोटी
नैसर्गिक नाला बांधकाम : १ कोटी