शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

काँग्रेसची आघाडी ‘वंचित’मुळं वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:16 AM

श्रीनिवास नागे। सांगली : संजयकाका पाटील यांनी लोकसभेची मॅच पुन्हा एकदा मारली. सांगलीत भाजपचं कमळ घट्ट रूजल्याचं तर दिसलंच, ...

श्रीनिवास नागे।सांगली : संजयकाका पाटील यांनी लोकसभेची मॅच पुन्हा एकदा मारली. सांगलीत भाजपचं कमळ घट्ट रूजल्याचं तर दिसलंच, पण काकांचा गट मजबूत असल्याचंही सिद्ध झालं. पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरच्या विरोधकांना गार करत काकांनी हुकुमत दाखवून दिली. ‘स्वाभिमानी’ची बॅट घेऊन ऐनवेळी मैदानात उतरलेल्या विशाल पाटील यांनी काकांविरोधात तुफान फलंदाजी केली, पण वंचित बहुजन आघाडीच्या गोपीचंद पडळकरांनी लक्षणीय मतं खात विशाल यांची दांडी गूल केली. काँग्रेस महाआघाडी विजयापासून वंचित राहण्यात ‘वंचित फॅक्टर’ कारणीभूत ठरला.प्रभावी जनसंपर्क, प्रत्येक तालुक्यात स्वत:च्या कार्यकर्त्यांचं जाळं, केंद्र आणि राज्यातल्या सत्तेच्या आधारावर जिल्ह्यात आणलेला निधी, विरोधकांतल्या दुसऱ्या-तिसºया फळीशी जवळीक, दीड वर्षापासून सुरू असलेली निवडणुकीची तयारी, कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून सिंचन योजनांना दिलेली गती आणि या सगळ्यांचं ‘परफेक्ट मार्केटिंग’ हे संजयकाकांचे ‘प्लस पॉइंट’ ठरले.काकांना उमेदवारी मिळू नये यासाठी पक्षांतर्गत विरोधकांनी लावलेली ‘फिल्डिंग’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोडून काढली. सांगलीची जबाबदारी काकांचे विरोधक महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर देऊन गुगली टाकली. विधानसभेच्या तिकिटाचा वायदा करत त्यांनी सगळी नेतेमंडळी काकांच्या प्रचारात उतरवली. काकांवर रूसलेले गोपीचंद पडळकर भाजपची जादा मतं खातील, असं दिसताच भाजपमधली धनगर समाजाची टीम सांगलीत आली. स्वत: मुख्यमंत्री दोनदा प्रचाराला आले.पराभूत मानसिकतेतील काँग्रेसनं खमक्या उमेदवार नसल्याचं कारण देत ही जागा महाआघाडीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली होती. मात्र त्यांच्याकडंही उमेदवार नव्हता. ऐनवेळी वसंतदादांचे नातू, काँग्रेसचे नेते विशाल पाटील ‘स्वाभिमानी’ची बॅट हातात घेऊन पिचवर उतरले. त्यामुळं किमान जिल्ह्यातील काँग्रेसचं आव्हान आणि अस्तित्व टिकून राहिलं. मॅचमध्ये रंगत आली. हा होता केवळ २३ दिवसांचा सामना! विशाल यांनी आक्रमक होत धुँवाधार बॅटिंग केली. सभा जिंकल्या. शरद पवारवगळता एकही मोठा नेता त्यांच्या प्रचारासाठी आला नव्हता. काँग्रेसच्या ‘हात’ या चिन्हाशिवाय लढणाºया विशाल यांच्यापुढं नवं चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं आव्हान होतं. त्यांना राजू शेट्टींची साथ मिळाली. मात्र वेळ कमी पडला... अर्थात तेवढा वेळ त्यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीतल्या काही नेत्यांना पुरेसा होता!जाता-जाता : केवळ संजयकाका पाटील यांना हिसका दाखवण्यासाठी उभ्या राहिलेल्या गोपीचंद पडळकरांनी लक्षणीय मतं घेतली. मात्र त्यांच्या या मतांचा फटका विशाल पाटील यांनाच जास्त बसला. धनगर समाजानं स्वत:चा उमेदवार म्हणून त्यांना बळ दिलंच, पण दलित-मुस्लिमांनीही पडळकरांची पाठराखण केली. ती मतं काँग्रेस आघाडीची म्हणजे विशाल पाटलांचीच होती ना!या निकालाचा ऐतिहासिक संदर्भसंजयकाका पाटील तसे पूर्वाश्रमीचे वसंतदादांचे पुत्र प्रकाशबापूंच्या गटाचे. काँग्रेस-राष्टÑवादी-भाजप असा प्रवास करणाºया काकांची राजकीय महत्त्वाकांक्षा मात्र दांडगी! मागील वेळी त्यांनीभाजपमध्ये संजयकाकांच्या मित्रांपेक्षा विरोधकच अधिक. मुख्यमंत्र्यांनी दम देऊनही काकांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी पडळकरांना रसद पुरवली. दुसरीकडं सुरुवातीला तिकीट घेण्यास नकार देणाºया विशाल पाटील यांना काँग्रेस किंवा स्वाभिमानीचं तिकीट मिळू नये यासाठी दबावतंत्र वापरणाºया काँग्रेस-राष्टÑवादीच्या नेत्यांनीही पडळकरांनाच ‘हात’ दिला. पडळकर दोन लाखावर गेले.ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश करून तिकीट मिळवलं आणि तत्कालीन खासदार प्रतीक पाटील यांना आस्मान दाखवलं. यंदा त्यांनी प्रतीक यांचे धाकटे बंधू विशाल यांना धूळ चारली.