शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
4
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
5
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
6
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
7
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
8
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
9
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
10
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
11
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
12
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
13
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
14
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
15
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
16
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
17
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
18
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
19
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
20
भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद, आता ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli-ZP Election: पलूसमध्ये काँग्रेस-भाजप अशीच लढत होणार, कुंडल गटातील लढत लक्षवेधी ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 18:59 IST

नितीन पाटील पलूस : जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे पडघम वाजल्याने नेते व इच्छुक उमेदवार रिचार्ज झाल्याचे पहायला मिळत ...

नितीन पाटीलपलूस : जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे पडघम वाजल्याने नेते व इच्छुक उमेदवार रिचार्ज झाल्याचे पहायला मिळत आहे. पलूस तालुक्यात काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच पुन्हा पारंपरिक लढत पहायला मिळणार आहे. महाआघाडी व महायुतीतच लढत पहायला मिळणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.बांबवडे, कुंडल राष्ट्रवादी अजित पवार गट वरचष्मा वगळता इतर ठिकाणी इतर पक्षांची ताकद नगण्य असल्याने युती व आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढली जाईल. पलूस तालुक्यात राजकारणाच्या नाड्या चार प्रमुख नेत्यांच्या हातात आहेत. काँग्रेसचे आमदार डाॅ. विश्वजित कदम यांच्याविरुद्ध भाजपमध्ये चित्र आहे. भाजपचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख माजी जिल्हा परिषद सदस्य संग्रामसिंह देशमुख, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड हे प्रमुख नेते आहेत. यांचा त्रिकोण या निवडणुकीत तरी एकत्र येऊन एकदिलाने लढणार का हा मोठा प्रश्न आहे. देशमुख बंधूमधील रुंदावलेली दरी अजूनही कमी झालेली नाही. तर शरद लाड यांची संग्राम लाड यांच्याशी वाढलेली जवळीक अनेक प्रश्नचिन्ह उभा करते. हे भाजपचे तीनही नेते एकदिलाने नांदले तरच एकास एक टक्कर होईल नाही तर ये रे माझ्या मागल्या... होत भाजपच पक्षाची ताकद दुभागून काँग्रेस याचा पुन्हा फायदा उठवणार का हे पहावे लागणार आहे.तालुक्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रदीप कदम व निलेश येसुगडे यांचा गट काय भूमिका घेणार हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. पलूस तालुक्यात ४ जिल्हा परिषद गट व ८ पंचायत समिती गण आहेत. कुंडल हा संवेदनशील गट असून इथे सर्वसाधारण लढत लक्षवेधी ठरणार आहे.जिल्हा परिषद गट

  • कुंडल गट : सर्वसाधारण
  • अंकलखोप गट : नागरिकांचा मागास प्रवर्ग
  • भिलवडी : सर्वसाधारण
  • दुधोंडी गट सर्वसाधारण महिला

पंचायत समिती गण

  • कुंडल बांबवडे : सर्वसाधारण महिला
  • दुधोंडी : नागरिकांचा मागास प्रवर्ग
  • रामानंदनगर : सर्वसाधारण
  • आमणापूर : सर्वसाधारण
  • अंकलखोप : अनुसूचित जाती जमाती
  • भिलवडी : नागरिकांचा मागास महिला प्रवर्ग
  • वसगडे : सर्वसाधारण महिला

पलूस तालुक्यातील या नेत्यांची मदत घ्यावीच लागेलकुंडल : काँग्रेसचे महेंद्र लाड, भाजप शरद लाड, पोपट संकपाळ,अंकलखोप : सतीश पाटील, घनशाम सूर्यवंशी, उदय पाटील, श्वेता बिरनाळे, भाजप सुरेंद्र चौगुले, राष्ट्रवादी अजित पवार, शरद पवार गटाचे नितीन नवले,दुधोंडी : भाजप शिवाजी जाधव, काँग्रेसचे सुनील सावंत, गणपतराव सावंत, मीनाक्षी सावंत, जे.के. जाधव.भिलवडी : काँग्रेस राजेंद्र पाटील, शहाजी गुरव, भाजप सुरेंद्र वाळवेकर, रमेश पाटील, श्रीकांत निकम, रोहित नलवडे तर मोहन तावदर यांचा पक्षाचा निर्णय गुलदस्त्यात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Congress-BJP fight in Palus ZP election; Kundal crucial.

Web Summary : Palus ZP election sees Congress versus BJP. Internal rifts within BJP could benefit Congress. Kundal is a key battleground. NCP's role crucial.