शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

कडेगाव तालुक्यात काँग्रेस-भाजपात संघष

By admin | Updated: February 2, 2015 00:13 IST

राजकीय वातावरण तापले : चोवीसपैकी सोळा सहकारी सोसायट्यांमध्ये चुरर्स

कडेगाव : कडेगाव तालुक्यात २४ सहकारी संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. यापैकी १६ सहकारी सोसायट्यांमध्ये काँग्रेस व भाजपमध्ये आमने-सामने सत्तासंघर्ष होईल, असे चित्र स्पष्ट होत आहे. याशिवाय आठ सोसायट्यांची निवडणूक बिनविरोध होणार, हे स्पष्ट झाले आहे.कडेगाव तालुक्यातील २४ सहकारी संस्थांमध्ये एकंदरीत ७२४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. निवडणूक प्राधिकरणाने सोसायटीसाठी १३ संचालकांची संख्या निश्चित केली आहे. वांगी येथील विठ्ठलदेव सोसायटीसाठी सर्वाधिक ६३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. याशिवाय अंबक सोसायटीसाठी ५७, हनुमान चिंचणी ४६, कुंभारगाव ४५, सोनकिरे २७, वडियेरायबाग ३८, अमरापूर ३९, आसद ४३, शिवणी ३२, नेर्ली ४२, पाडळी ३१, देवराष्ट्रे ५0, उपाळे मायणी ११, सोनसळ १२, कडेपूर १५, हिंगणगाव खुर्द १३, कान्हरवाडी १३, विहापूर १३, सोहोली १३, शिरसगाव १३, असे ७२४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.सोनसळ सोसायटी मोहनराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध होत आहे, तर कडेपूर सोसायटी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध होत आहे. याशिवाय विहापूर, कान्हरवाडी, शिरसगाव, सोहोली, हिंगणगाव खुर्द, उपाळे मायणी या सोसायट्याही बिनविरोध होत आहेत. या आठही संस्था बिनविरोधची केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. अन्य १६ सहकारी संस्थांत मात्र काँग्रेस व भाजपमध्ये आमने-सामने निवडणूक होणार हे स्पष्ट झाले आहे. काही संस्थांत मात्र काँग्रेसला गटबाजीचे ग्रहण लागले आहे. वांगी, देवराष्ट्रे आणि चिंचणी (वांगी) या तिन्ही संस्थांची निवडणूक लक्षवेधी ठरणार, असे चित्र आहे. (वार्ताहर)ओळखपत्र अनिवार्यसहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान करणाऱ्या सभासदांना निवडणूक प्राधिकरणाने १७ प्रकारची ओळखपत्रे ग्राह्य मानली आहेत. यापैकी छायाचित्र असलेले किमान एक तरी ओळखपत्र मतदानावेळी दाखविणे अनिवार्य आहे.