राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून विद्यापीठाचे अभिनंदन
By Admin | Updated: July 27, 2014 23:00 IST2014-07-27T21:53:32+5:302014-07-27T23:00:33+5:30
विद्यापीठ यापुढील काळातही यशस्वी वाटचाल करीेल,

राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून विद्यापीठाचे अभिनंदन
कोल्हापूर : उच्च शिक्षण संस्थांच्या ‘स्कोपस २००७-११’ सर्वेक्षणात देशातील सर्वोत्कृष्ट २५ शैक्षणिक संस्थांमध्ये १४वे स्थान पटकावल्याबद्दल राज्यपाल के. शंकरनारायणन आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्र पाठवून शिवाजी विद्यापीठाचे विशेष अभिनंदन केले आहेसंदर्भ मूल्याधिष्ठित संशोधनात विद्यापीठाने देशात १४वे स्थान मिळविल्याबद्दलचा सविस्तर अहवाल ‘करंट सायन्स’ संशोधन पत्रिकेत जून २०१४ च्या अंकात प्रसिद्ध झाला. विद्यापीठाच्या यशाबद्दल राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी कुलगुरू
डॉ. एन. जे. पवार यांना पत्र पाठवून अभिनंदन केले. गुणवत्तापूर्ण संशोधन कार्य आणि उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी विद्यापीठ यापुढील काळातही यशस्वी वाटचाल करीेल, असा विश्वासही राज्यपालांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विद्यापीठाच्या यशात योगदान देणाऱ्या सर्व घटकांचे अभिनंदन केले. भविष्यातील वाटचालीसाठीही त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. (प्रतिनिधी)