काँग्रेसची विकासकामे जनतेसमोर मांडा
By Admin | Updated: July 3, 2014 01:00 IST2014-07-03T00:52:13+5:302014-07-03T01:00:35+5:30
प्रकाश सातपुते : कुपवाडमधील पक्षबैठकीत आवाहन

काँग्रेसची विकासकामे जनतेसमोर मांडा
कुपवाड : काँग्रेस पक्षाला लोकसभेमध्ये पराभव पत्करावा लागला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली आहे. ही मरगळ झटकून कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या तयारीला लागावे, तसेच पक्षाने केलेली जनहिताची विकासकामे जनतेसमोर मांडावीत, असे आवाहन काँग्रेसचे विधानसभा समन्वयक प्रकाश सातपुते यांनी आज येथे केले. कुपवाड शहर काँग्रेसच्यावतीने आयोजित पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. शहर जिल्हाध्यक्ष मुन्ना कुरणे, कुपवाड शहर अध्यक्ष व नगरसेवक गजानन मगदूम, अण्णासाहेब उपाध्ये, विजय खोत, अरुण रूपनर प्रमुख उपस्थित होते. शहर जिल्हाध्यक्ष कुरणे यांनीही काँग्रेसच्या जनहिताच्या कामांचा लेखाजोखा मांडण्याचे आवाहन केले. नगरसेवक गजानन मगदूम यांनी कुपवाड शहरासाठी पाच कोटी रूपयांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर झाले असल्याची माहिती दिली. यावेळी नेहमीच मताधिक्य देणाऱ्या शहरातील कार्यकर्त्यांना बळ देण्याचे आवाहन विविध पदाधिकाऱ्यांनी केले. बैठकीस बाळासाहेब मंगसुळे, आयनुद्दीन मुजावर, सनी धोतरे, शंकर कोकरे, अजय माने, हणमंत सायमोते, नियाज मुजावर, श्रीपाल कोल्हापुरे, बापूसाहेब तोडकर, हणमंत सरगर, देवेंद्र पाटील, अभिजित परीट आदी उपस्थित होते. (वार्ताहर)