बोरगावला लसीकरणावेळी नियोजनाअभावी गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:20 IST2021-06-26T04:20:08+5:302021-06-26T04:20:08+5:30

बोरगाव : बोरगाव (ता. वाळवा) येथे शुक्रवारी कोरोना लसीकरणावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. लसीकरणासाठी नागरिकांची झुंबड उडाल्याने कोरोना नियमांची ...

Confusion due to lack of planning during Borgaon vaccination | बोरगावला लसीकरणावेळी नियोजनाअभावी गोंधळ

बोरगावला लसीकरणावेळी नियोजनाअभावी गोंधळ

बोरगाव : बोरगाव (ता. वाळवा) येथे शुक्रवारी कोरोना लसीकरणावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. लसीकरणासाठी नागरिकांची झुंबड उडाल्याने कोरोना नियमांची पायमल्ली झाली होती. हा प्रकार आरोग्य विभागाच्या समोर घडत असताना मात्र आरोग्य विभागाने गांधारीची भूमिका घेतल्याने थोडा वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

बोरगाव कोरोनाचे हाॅटस्पाॅट बनले आहे. ही परिस्थिती आरोग्य विभागाला माहिती असतानाही गावातील एका सभागृहात लसीकरण घेतले होते. लसीचे अवघे शंभरच डोस उपलब्ध असताना कोणतेही नियोजन करण्यात आले नाही. लसीकरण केंद्रावर लोकप्रतिनिधीही दिसत नव्हते. ३० वर्षे वयोगटावरच्या नागरिकांना लसीकरण करण्याचे आदेश असतानाही १८ वर्षे वयोगटातील तरुणांनी गर्दी केली होती. यामुळे रांगेत बराच वेळ प्रतीक्षा करत ताटकळत बसलेल्या वयस्क महिला व पुरुषांना या लसीकरणापासून वंचित रहावे लागले. यामुळे गोंधळ उडाला व काही काळ लसीकरण थांबले होते. या सर्व प्रकारात ३० वर्षावरील नागरिकांना मात्र लसीकरणापासून वंचित रहावे लागले. यापुढे तरी नियमांचे पालन करुन पोलीस बंदोबस्तात लसीकरणाचे योग्य नियोजन करावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Web Title: Confusion due to lack of planning during Borgaon vaccination